ब्रशने आपण दात स्वच्छ करतो; परंतु ब्रश विविध वयाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळे व योग्य असावेत. लहान मुलांसाठी त्यांचे तोंड लहान असल्याने विशेषकरून लहान मुलांकरिता तयार करण्यात आलेले ब्रश उपयोगी पडतात. मोठ्या व्यक्तींनी दात स्वच्छ करताना आपण ज्याप्रमाणे झाडू फिरवितो त्याप्रमाणे ब्रश आतून बाहेर फिरवावा.
जेणेकरून अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडतील. ब्रश वर-खाली या पद्धतीने फिरविल्यास दातांच्या फटीमध्ये अडकलेले कण निघून जातात.
काही वेळा ब्रश खराब होतो आणि आपण तो वापरतच राहतो. खराब ब्रशमुळे हिरड्या दुखावल्या जातात. त्यामुळे ब्रश खराब झाल्यावर ताबडतोब फेकून द्यावा.