पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त उसळले की पोटात जळजळ, छातीत जळजळ होते.
उलटीने माणूस हैराण जातो. पित्त होण्याची करणे आजकाल की अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट खाणे, फास्ट फूड खाणे, रात्रीची जागरणे, खूप काल उपाशी राहणे, वेळी-अवेळी खाणे, मसालेदार खाणे, चहा जास्त पिणे. मग पित्तावर उपाय म्हणून अँटासिड घेण्यात येतात.
पित्त कसे टाळावे –
- आपली दैनिक जीवनशैलीमध्ये थोडे बदल करणे गरजेचे आहे. रात्रीचे जागरण टाळावे.
- पित्ताचा त्रास जाणवत असल्यास 4 ते 5 तुळशीचे पाने चावून खा. रिकाम्यापोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धुवून चघळली तरी पित्त कमी होते. नियमित सेवन केल्यानं ऍसिडिटीचा त्रास होत नाही.
- बडीशेप चघळल्याने देखील पित्त कमी होण्यास मदत होते. किंवा बडीशेप गरम पाण्यात टाकून घेतल्यानेही फरक जाणवतो.
- जिरे खाल्याने पचन सुधारते आणि शरीरातील गॅस दूर होतात.
- पुदिन्याची पाने सकाळी गरम पाण्यात घेतल्याने पित्त कमी होण्यास मदत मिळते.
- मनुका दुधात उकळून गार करून पिल्याने चांगला फायदा होतो. किंवा गार दूध घेतल्यास ऍसिडिटी कमी होते.
– डॉ आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर.