नवी दिल्ली : जगामध्ये करोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग हा झपाट्याने वाढला आहे. त्यातही ज्या देशांमध्ये देशात करोना लसीकरणामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश आहे. भारतात 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. देशभरात 7 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 57,75,322 लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. असे असले तरी लसीकरणावरून अनेकांच्या मनात लसीकरणाबाबत अनेक प्रश्न आहे.
त्यापैकीच एक म्हणजे करोना लस घेतल्यानंतर आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध करू शकतो की नाही? असा प्रश्न सध्या गुगलवर जास्त प्रमाणात सर्च केला जातो आहे. तसेच करोना लस घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणं किती सुरक्षित आहे? अशा आशयाचे प्रश्न सुद्धा सोशलवर चर्चेत येत आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. मात्र या प्रश्नांवर वृत्तपत्रांनी तज्ज्ञांचे मत मांडले आहे.
इंग्रजी वृत्त पत्राशी संवाद साधतांना गाजियाबाझच्या कोलंबिया एशिया रुग्णालयातील इंटरनल मेडिसीन डॉ. दीपक वर्मा यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.
–करोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्यायला हवी.
–करोना लस घेणाऱ्या पुरुष आणि महिलांनी करोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर गर्भनिरोधकांचा वापर करायला हवा.
-SARS-CoV2 हा एक नवा व्हायरस आहे. त्याला निष्क्रिय करण्यासाठी लस तयार करण्यात आली आहे. पण या लशीचा दीर्घकालीन दुष्परिणाम काय आहे आणि त्याचा पुरुष किंवा महिलांच्या सेक्सवर काय प्रभाव होतो हे अद्याप सांगणं अशक्य आहे.