Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती पावले चालावे? जाणून घ्या…

by प्रभात वृत्तसेवा
May 13, 2021
in आरोग्य वार्ता, आरोग्यपर्व, फिटनेस, लाईफस्टाईल
A A
कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती पावले चालावे? जाणून घ्या…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपण सगळे निरोगी राहण्यासाठी योगाचा, व्यायामाचा अवलंब करतो.  बरेच लोक जिममध्ये जाऊन घाम गाळतात.  परंतु याउलट दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते.  होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

यामुळे रक्ताभिसारण उत्तम होत असल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराची शक्यता कमी असते.  मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.

सकाळी हवामान स्वच्छ ताजे असते.  मोकळ्या हवेत चालण्याने हृदय व मन निरोगी होते.  मानसिक आणि शारीरिक विकासामुळे रोगांचे प्रतिबंध टाळले जाते.  दिवसभर रीफ्रेश वाटल्यामुळे मूड चांगला राहतो.

 वयानुसार कोणी किती चालावे ?

 * वय 6 ते 17
मुले  – 15,000 पावले
मुली – 12,000 पावले

* वय 18 ते 40 
या लोकांना 12,000 पावले चालणे आवश्यक आहे.

 * वय 40 ते 49 
यांनी दररोज 11,000 पावले चालली पाहिजेत.

* वय 50 ते 59 
या लोकांनी 11,000 पावले चालावे.

* वय 60 व त्यापेक्षा अधिक 
60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी दररोज 8,000 पावले चालणे आवश्यक आहे.  यासह या वयात आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.  अशा परिस्थितीत आपण आपल्या गरजेनुसार कमीतकमी चालणे ठेवू शकता.

आता पाहुयात सकाळी फिरण्याचे आश्चर्यकारक फायदे…

  1. मधुमेह नियंत्रित होतो

दररोज चालणे मधुमेह नियंत्रणास मदत करते.  यामुळे शरीरात ग्लूकोजचे प्रमाण समान राहते.  त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी फिरायला जायलाच हवे.

  1. हृदय निरोगी राहते
    चालण्यामुळे शरीराची चांगली हालचाल होते.  हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.  एका संशोधनानुसार, दररोज चालण्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका 32 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
  2. मेंदू तल्लख राहते
    सकाळी चालण्यामुळे मेंदूला योग्य पद्धतीने ऑक्सिजन मिळते. अशा परिस्थितीत कम करण्याची शक्ती वाढते. मन शांत होते तसेच एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत होते.
  3. कर्करोगास प्रतिबंध होतो
    सकाळी ताज्या हवेत चालण्याने प्रतिकारशक्ती वाढते.  त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा  धोका कमी होतो.
  4. फुफ्फुसांचे कार्यक्षमता वाढते
    फेरफटका मारण्याने श्वसनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळून  फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
  5. संधिवातामध्ये फायदेशीर
    आजच्या काळात चुकीच्या जीवनशैली तसेच आहारामुळे लोक संधिवाताने ग्रस्त आहेत.  यामुळे बर्‍याच लोकांना चालण्यासही त्रास होतो.  एका संशोधनानुसार, मॉर्निंग वॉकमुळे सांधे आणि स्नायू बळकट होण्यास मदत होते.  त्यामुळे संधिवात असलेल्या रुग्णांना दररोज फिरायला जाणे आवश्यक आहे.
  6. ताणतणाव दूर होतो
    आजच्या काळात प्रत्येक माणूस वेगवेगळ्या तणावाने  त्रस्त आहे.  दररोज 20-30 मिनिटे चालल्याने ताण कमी होण्यास मदत होते.
  7. वजन कमी होते
    लठ्ठ लोकांनी दररोज मॉर्निंग वॉक करणे आवश्यक आहे.  यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते.  हे ओटीपोट, कंबर, मांडीभोवती साठलेली चरबी कमी करण्यास मदत करते.  तसेच शरीराला योग्य आकार मिळतो.
  8. अशक्तपणा आणि थकवा दूर होतो

चालण्यामुळे शरीरात उर्जा संचारते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा इत्यादींचा त्रास कमी होतो.

  1. रोग प्रतिकारशक्ती वाढते
    दररोज सकाळी चालल्यामुळे शरीराला योग्य ऑक्सिजन मिळते.  तसेच रक्ताभिसारण चांगले होते.  रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे हंगामी व इतर रोगांचे प्रमाण कमी होते.
Tags: aarogya jagaraarogya jagar 2021aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarvegetablevegetables benefits in marathi
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar