पुणे – आजच्या व्यस्त जीवनशैलीत सुट्टीवर जाणे कोणाला आवडत नाही? सुट्टीमुळे (Travelling Tips) काही दिवसांच्या धकाधकीच्या जीवनातून आराम मिळतो आणि मूडही फ्रेश होतो. जेव्हा बहुतेक लोक सुट्टीवर जातात तेव्हा ते काही महिने आधीच हॉटेल बुक (Hotel Booking) करतात. त्यांच्यासाठी ते सोयीचे होते.
पण तुम्हाला माहित आहेत का? तुम्ही तुमची हॉटेल रूम बुक (Hotel Booking) करताना काही लहान-मोठ्या चुका करत आहेत. ज्यामुळे तुमची प्रवासाची मजाच खराब होते. आज आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स देणार (Travelling Tips) आहोत, की प्रवासात हॉटेल बुक करताना याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
खोली पॅन्ट्रीजवळ (गोदाम) असणे – बरेचदा लोक ऑनलाइन रूम बुक करतात आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना कळते की त्यांचे राहण्याचे ठिकाण पॅन्ट्रीच्या (गोदाम) जवळ आहे. नेहमी भांडी किंवा इतर गोष्टींचा आवाज चिडचिडेपणाचे कारण बनू शकतो.
लिफ्टजवळची खोली – अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत लोक लिफ्टजवळ खोली बुक करतात. येथे सतत लोकांची वर्दळ असते आणि यामुळे तुमची शांतता हिरावून घेतली जाऊ शकते. चुकूनही ही चूक करू नका.
स्वस्त रूम हवी – अनेक वेळा लोक स्वस्त रूम घेण्याच्या मागे लागून अशी हॉटेल्स निवडतात जे त्यांच्यासाठी त्रासाचे कारण बनतात. स्वस्त खोल्यांमुळे पैसे वाचतील, पण सुविधांच्या नावाखाली तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.
लोकेशन – हॉटेल रूम बुक करण्यापूर्वी, तुम्ही हॉटेलचे ठिकाण तपासावे, जेणेकरून ते त्या शहराच्या किंवा ठिकाणच्या प्रमुख पर्यटन स्थळांच्या जवळ आहे. जेणेकरुन तुम्ही सहज राहू शकाल आणि पैशांची बचत देखील करू शकता.
हॉटेल रिव्ह्यू – हॉटेलचे बुकिंग करताना सर्वप्रथम हॉटेलचे रिव्ह्यू वाचा. इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्सवर तुम्हाला हॉटेल्सची रिव्ह्यू सापडतील. त्यामुळे तुम्हाला हॉटेल बुक करताना मोठी मदत होईल.
The post Hotel Booking Tips : हॉटेल बुक करताना तुम्हीही ‘या’ छोट्या चुका करता? तर ही खास बातमी नक्की वाचा…. appeared first on Dainik Prabhat.