[[{“value”:”
Home Remedy For Dry Lips: हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना ओठ कोरडे होणे, फुटणे किंवा काळपट दिसणे अशी समस्या जाणवते. शरीरात पाण्याची कमतरता, थंडीची हवा, जास्त ऊन यामुळे ओठ सर्वात आधी कोरडे पडतात. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक जण वारंवार लिप बाम लावतात. मात्र, काही लिप बाम ओठ बरे करण्याऐवजी उलट अधिक कोरडे करतात.
जर तुमचे ओठ सतत कोरडे, फाटलेले आणि निस्तेज दिसत असतील आणि लिप बाम लावूनही फरक पडत नसेल, तर आता घरगुती आणि नैसर्गिक उपाय वापरण्याची वेळ आली आहे. हे उपाय आजीच्या काळापासून वापरले जात असून आजही प्रभावी मानले जातात.
हे उपाय कोणत्याही साइड इफेक्टशिवाय ओठांना मुलायम, गुलाबी आणि निरोगी बनवण्यास मदत करतात.
१) मध
मधात नैसर्गिक ओलावा असतो. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावा आणि सकाळी कोमट पाण्याने धुवा. रात्रभर ठेवायचे नसेल तर २ ते ३ तासांनी ओठ धुवू शकता.
२) नारळ तेल
नारळ तेल ओठांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ बनवते. लिप बामऐवजी दिवसातून २–३ वेळा ओठांवर हलकं नारळ तेल लावा. यातील पोषक घटक ओठांसाठी फायदेशीर ठरतात.
३) साखर आणि तूप याचा स्क्रब
ओठांवर पपडी जास्त साचत असेल तर हा उपाय उपयोगी आहे. १ चमचा बारीक साखर आणि काही थेंब तूप मिसळून हलक्या हाताने ओठांवर स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते.
(टीप : साखर खूप जाड नसावी, अन्यथा ओठांना इजा होऊ शकते.)
४) कोरफडीचा जेल
कोरफड त्वचेसाठी जितकी फायदेशीर आहे, तितकीच ओठांसाठीही उपयुक्त आहे. दररोज झोपण्यापूर्वी ओठांवर एलोवेरा जेल लावा.
यामुळे ओठांना थंडावा मिळतो आणि कोरडेपणा कमी होतो.
५) दुधाची साय
दुधाची साय ओठांचा कोरडेपणा कमी करून रंगत सुधारण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी ताज्या दुधाची साय ओठांवर लावा.
नियमित वापर केल्यास चांगला फरक दिसून येतो.
वरील माहिती ही सामान्य जनजागृतीसाठी आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
The post Home Remedy For Dry Lips: ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी लिप बामची गरज नाही; घरगुती उपाय करून पाहा appeared first on Dainik Prabhat.
“}]]
