Friday, May 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Home Remedies: ‘आजीबाईचा बटवा’… घरच्या घरी किरकोळ दुखण्यांवर रामबाण उपाय

by
February 21, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Home Remedies: आपल्या दैनंदिन आयुष्यात ताप येणे, पोटात दुखणे, पाय ठणकणे, छातीत जळजळ होणे, मळमळ, घसा खवखवणे अशी छोटी-मोठी दुखणी वारंवार होत असतात. अशा वेळी आपण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो. मात्र पूर्वीच्या काळी घरातच या किरकोळ तक्रारींवर सोपे आणि परिणामकारक उपाय केले जात. यालाच प्रेमाने “आजीबाईचा बटवा” असे म्हटले जात असे. या बटव्यात घरगुती औषधी उपाय नेहमी तयार असायचे.

तापावर घरगुती उपाय :

ताप आल्यास पुदिना आणि आल्याचा काढा खूप उपयोगी ठरतो. त्यात थोडी मेथी आणि मध घातल्यास फायदा अधिक होतो. तुळशीच्या पानांचा काढा करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो. थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने घाम येतो आणि ताप कमी होतो. दालचिनी, सुंठ, लवंग आणि गवती चहा एकत्र उकळून दिवसातून दोनदा घेतल्यास अंगदुखी आणि सर्दीवर आराम मिळतो. बेलफळाचे चूर्ण पाण्यात घेणेही उपयोगी ठरते.

तापात मनुके पाण्यात भिजवून कुस्करून त्यात लिंबाचा रस घालून खावे. तसेच सफरचंद, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा आणि कारले यांचा आहारात समावेश करावा. भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. तुळशीचा काढा मलेरिया किंवा डेंग्यूसारख्या तापातही फायदेशीर ठरतो. संत्र्याचा रस घेतल्याने शरीराला ताकद मिळते.

पाय दुखत असतील तर :

दिवसभर चालल्यानंतर पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा टाकून त्यात पाय ठेवावेत. यामुळे पायांना आराम मिळतो. पायाला फोड आले असतील तर कोमट पाण्यात थोडे लिस्टरीन मिसळून त्यात पाय बुडवावेत. त्यामुळे संसर्ग कमी होतो. उन्हामुळे आलेल्या डागांवर थंड केलेल्या चहाच्या पाण्याने टॉवेलने हलके चोळल्यास फायदा होतो.

घसा खवखवत असेल तर :

सफरचंदाचे व्हिनेगर पाण्यात मिसळून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. कोमट पाण्यात बेकिंग सोडा घालून प्यायल्याने छातीतली जळजळ कमी होते. जखम झाल्यास त्यावर मध लावल्याने जखम लवकर भरते. आल्याच्या चहात मध आणि लिंबू घालून प्यायल्यास मळमळ कमी होते. लसणाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घसा स्वच्छ होतो.

झोप न लागल्यास :

चेरी फळात मेलाटोनिन असते, जे झोप सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे झोपेची समस्या असल्यास चेरी खाणे फायदेशीर ठरते.

हे उपाय किरकोळ तक्रारींवर उपयोगी असले तरी गंभीर आजारात डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तरीही आजीबाईच्या बटव्यातील हे साधे, नैसर्गिक उपाय आजही तितकेच परिणामकारक आणि उपयुक्त आहेत.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar