Tuesday, September 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Holi Special Shahi Thandai Recipe: ५ मिनिटांत तयार होणारी घरगुती शाही ठंडाई; पाहुणे नक्की विचारतील रेसिपी!

by
March 3, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Holi Special Shahi Thandai Recipe: होळी हा रंग, आनंद आणि एकत्र येण्याचा सण आहे. या दिवशी रंगांची उधळण जितकी महत्त्वाची असते, तितकेच महत्त्व असते स्वादिष्ट पदार्थ आणि थंड पेयांचे. अनेक जण बाजारात मिळणारी तयार ठंडाई किंवा थंड पेये आणतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, अशा पेयांमध्ये जास्त साखर आणि कृत्रिम घटक असतात, जे आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे यंदाच्या होळीत ( Holi ) घरच्या घरी बनवलेली शाही ठंडाई हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

घरची ठंडाई पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार केली जाते. यात कोणतेही कृत्रिम रंग किंवा रसायने नसतात. त्यामुळे ती चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. या पेयामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि दिवसभराच्या धावपळीतून आलेला थकवाही कमी होते.

घरची ठंडाई खास का आहे? (Holi Special Shahi Thandai Recipe)

या ठंडाईत वापरले जाणारे बदाम, काजू आणि पिस्ते हे प्रथिनांनी भरपूर असतात. सौंफ आणि वेलची पचन सुधारण्यास मदत करतात. खसखस आणि मगज (खरबूज-टरबूज बिया) शरीराला थंडावा देतात. केशर मन प्रसन्न ठेवते, तर सुक्या गुलाबाच्या पाकळ्या सुगंध आणि चव वाढवतात. अशा पौष्टिक घटकांमुळे ही ठंडाई फक्त चवदारच नाही तर ऊर्जा देणारीही ठरते.

साहित्य: (Holi Special Shahi Thandai Recipe)

सौंफ, खसखस, काळी मिरी, वेलची, मगज बिया, बदाम, काजू, पिस्ते, केशर धागे, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि चवीनुसार साखर किंवा गूळ. तसेच थंड दूध.

कृती:

१. सर्वप्रथम बदाम, काजू, मगज बिया, खसखस आणि सौंफ हे सर्व ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा. शक्य असल्यास रात्रभर भिजवले तरी चालेल. त्यामुळे हे पदार्थ मऊ होतात आणि त्यातील पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे मिळतात.

२. भिजवलेली सर्व सामग्री मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून गुळगुळीत आणि मऊ पेस्ट तयार करा.

३. एका मोठ्या भांड्यात थंड दूध घ्या. त्यात तयार केलेली पेस्ट मिसळा आणि चांगले ढवळा.

४. चवीनुसार साखर किंवा गूळ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवा.

५. शेवटी त्यात बर्फाचे तुकडे, केशर धागे आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घाला. वरून बारीक चिरलेले बदाम आणि पिस्त्याने सजवा.

अशी तयार झालेली शाही ठंडाई पाहुण्यांसमोर वाढा. तिची चव इतकी अप्रतिम लागेल की प्रत्येक जण तुमच्याकडून रेसिपी नक्की विचारेल.

या होळीत रासायनिक पेयांना दूर ठेवून नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय निवडा. घरच्या घरी बनवलेली ही शाही ठंडाई सणाचा आनंद दुप्पट करेल आणि पाहुण्यांवरही खास छाप पाडेल.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar