Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Holi Special: होळीच्या रंगांनंतर त्वचा उजळणार! घरच्या घरी बनवा पारंपरिक उटणे

by
March 2, 2026
in लाईफस्टाईल
A A
Holi Special: होळीच्या रंगांनंतर त्वचा उजळणार! घरच्या घरी बनवा पारंपरिक उटणे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Holi Special: होळी म्हटलं की रंग, मजा आणि उत्साह. पण रंग खेळल्यानंतर त्वचेची अवस्था बऱ्याचदा खराब होते. कितीही काळजी घेतली तरी काही रंग त्वचेवर बसतातच. अशावेळी केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपाय जास्त फायदेशीर ठरतात. आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून वापरात असलेले पारंपरिक उटणे हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

पूर्वी होळीच्या आदल्या दिवशी किंवा रंग खेळून आल्यावर अंघोळीपूर्वी उटणे लावण्याची पद्धत होती. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते, रंग सहज निघतो आणि त्वचेला नैसर्गिक पोषणही मिळते. आजही अनेक घरांमध्ये ही परंपरा पाळली जाते.

उटण्यासाठी लागणारे साहित्य :

– बेसन
– दही किंवा कच्चे दूध
– हळद
– लिंबाचा रस
– बदाम तेल किंवा नारळ तेल
– आवश्यक असल्यास गुलाबपाणी

उदाहरणार्थ, २ चमचे बेसन घेतले तर तेवढेच दही घ्या. हळद त्याच्या अर्ध्या प्रमाणात घालावी. मिश्रण खूप घट्ट झाले तर थोडे कच्चे दूध किंवा गुलाबपाणी घालून ते मऊसर करा.

उटणे कसे बनवावे?

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात दही घाला. नंतर हळद आणि थोडेसे तेल मिसळा. हे सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करून गुळगुळीत आणि घट्ट पेस्ट तयार करा. शेवटी थोडासा लिंबाचा रस घाला. मात्र लिंबाचा रस जास्त वापरू नका, कारण तो आम्लयुक्त असतो. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी लिंबू टाळले तरी चालेल. हे उटणे होळीच्या एक दिवस आधी बनवून ठेवले तरी हरकत नाही.

उटणे कसे लावावे?

हे उटणे चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर लावता येते. लावल्यानंतर किमान १५ मिनिटे तसेच ठेवावे. सुमारे ७० टक्के वाळल्यानंतर हातावर थोडे दूध किंवा गुलाबपाणी घेऊन गोलाकार हालचालीत हलक्या हाताने मसाज करत उटणे काढावे. त्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करावी.

हे उटणे फक्त होळीपुरतेच नाही, तर दर १५ दिवसांनी वापरले तरी त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते.

उटण्याचे फायदे :

या उटण्यात वापरलेले दही त्वचेला ओलावा देते आणि स्वच्छ करते. त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. हळद रंग उजळवण्यास मदत करते आणि त्वचेची सूज किंवा जळजळ कमी करते. बेसन त्वचेवरील मृत पेशी आणि घाण काढून टाकते. त्यामुळे त्वचेचे छिद्र स्वच्छ होतात आणि वारंवार होणाऱ्या त्वचेच्या समस्या कमी होतात.

होळीच्या रंगांमुळे त्वचेला होणारी जळजळ किंवा कोरडेपणा कमी करण्यासाठीही हे उटणे उपयुक्त ठरते. नैसर्गिक घटकांमुळे त्वचेला कोणताही अपाय होत नाही आणि ती आतून पोषित होते.

या होळीला केमिकल्सपासून दूर राहून घरगुती उटण्याचा वापर करा आणि नैसर्गिकरीत्या उजळ, निरोगी त्वचा मिळवा.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar