[[{“value”:”
HMPV Virus : करोनाच्या प्रादुर्भावाला पाच वर्षांच्यावर कालावधी उलटून गेल्यानंतर आता चीनमध्ये पुन्हा नव्या विषाणूने डोकं वर काढलं आहे. याची लक्षणे देखील करोना विषानुसारखीच आहे. विशेष म्हणजे या व्हायरसने लहान बाळांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. या विषाणूचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना (दोन वर्षांखालील) असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘एचएमव्हीपी’ असं या घातक विषाणूच नाव असून, याचा अर्थ ‘ह्युमन मेटान्यूमोव्हायर’ असा होतो. सध्या या विषाणूने अक्षरशः थैमान घातलं आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूने आता आपल्या भारतात सुद्धा प्रवेश केला असून, त्याचे हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. या संबंधीचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या माध्यमांतून समोर येत आहे.
गुजरात, कर्नाटक, बंगळूर आणि नागपूर अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. प्रत्येक शहरातील महापालिकेच्या वतीने तयारी देखील केली गेली आहे. ‘एचएमपीव्ही’ हा एक श्वसनमार्गाशी संबंधित विषाणू आहे जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर आणि श्वसनमार्गांवर थेट परिणाम करतो.
दरम्यान, हा विषाणू पहिल्यांदा 2011 मध्ये ओळखला गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. एका डच संशोधकाने श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू शोधला होता. हा विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणात असतो, परंतु हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
पण या विषाणू सारखेच अनेक व्हायरस यापूर्वी देखील आपल्या देशात होऊन गेले आहे. यातील काही व्हायरस आज सुद्धा भारतात अस्तित्वात आहेत. आणि त्यांचा लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसून येतो. भारतात लहान मुलांवर विशेषतः परिणाम करणारे आणि त्यांच्यासाठी घातक असणारे 10 महत्त्वाचे विषाणू आहेत. ज्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. आणि हे विषाणू तुमच्या बाळाला कश्या प्रकारे टार्गेट करतात? आरोग्यावर कसा परिणाम होतो? त्याचे लक्षणे कोणते आहेत आणि लसीकरण, हे देखील यामध्ये पाहुयात…
लहान मुलांसाठी सर्वात घातक व्हायरस :
भारतातील लहान मुलांसाठी सर्वात घातक आजारांमध्ये निमोनिया, डायरिया, आणि कुपोषणाशी संबंधित आजार हे प्रमुख आहेत. त्यापैकी कोणता आजार जास्त घातक आहे, हे परिस्थिती आणि वैयक्तिक बाबींवर अवलंबून असते. तरीही, ‘निमोनिया आणि डायरिया’ हे दोन भारतातील बालमृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी आहेत.
1. निमोनिया : लहान मुलांमध्ये फुफ्फुसांचा संसर्ग गंभीर स्वरूप धारण करतो. ऑक्सिजनची पातळी कमी होऊन मृत्यू होऊ शकतो.
लक्षणे: श्वास घेताना त्रास, त्वचा निळसर पडणे, ताप, खोकला.
उपाय: लस. वेळीच अँटीबायोटिक्स आणि वैद्यकीय उपचार.
2. डायरिया : तीव्र जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होऊन निर्जलीकरण होते. वेळीच उपचार न केल्यास मृत्यू देखील होतो.
लक्षणे: सतत जुलाब (पाण्यासारखे), उलटी, दुर्बलता.
उपाय: रोटाव्हायरस लस आणि झिंक सप्लिमेंट.
भारतातील सर्वात घातक 10 व्हायरस कोणते?
1. रोटाव्हायरस : लहान मुलांमध्ये तीव्र डायरिया (अतिसार) होण्याचे प्रमुख कारण.
लक्षणे: सतत पाण्यासारखे जुलाब होणे, उलटी, निर्जलीकरण.
प्रतिबंध: रोटाव्हायरस लस नियमित लसीकरण वेळापत्रकात आहे. आणि सभोवताली स्वच्छतेचे काटेकोर पालन करा.
2. रिस्पिरेटरी सिंशियल व्हायरस : लहान मुलांमध्ये ब्रॉन्किओलायटीस आणि निमोनियासाठी जबाबदार आहे. यामध्ये गंभीर श्वसन त्रास उद्भवू शकतो.
लक्षणे: खोकला, ताप, आणि श्वास घेण्यास त्रास.
प्रतिबंध: श्वसनमार्गाची स्वच्छता आणि आजारी व्यक्तींशी संपर्क टाळणे.
3. गोवर व्हायरस : हा विषाणू भारतात बालमृत्यूचे मोठे कारण असल्याचं नेहमीच दिसून येत. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास जास्त घातक.
लक्षणे: ताप, खोकला, नाक गळणे, डोळे लाल होणे. आणि त्वचेवर लाल पुरळ येणे.
प्रतिबंध: डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घेणे. आणि एमएमआर लस.
4. कुपोषण : कुपोषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इतर आजारांचा धोका वाढतो.
कारणे: अन्नधान्याचा अभाव, अशुद्ध पाणी, आणि कुटुंबाचे आर्थिक प्रश्न.
उपाय: संतुलित आहार, स्तनपान, आणि पूरक आहार.
5. डेंगू व्हायरस : लहान मुलांमध्ये डेंगू फीव्हर घातक ठरू शकतो. प्लेटलेट्सची संख्या घटल्याने रक्तस्राव होण्याचा धोका.
लक्षणे: तीव्र ताप, अंगदुखी, आणि त्वचेवर पुरळ.
प्रतिबंध: डास प्रतिबंधक उपाय, जसे की जाळी, डास प्रतिबंधक क्रीम, आणि स्वच्छता.
6. एनसेफेलायटीस व्हायरस : मेंदूच्या सूजेचे प्रमुख कारण. याचे लक्षणे तीव्र असू शकतात, उदा. झटके आणि बेशुद्धी.
लक्षणे: ताप, डोकेदुखी, उलटी, भ्रम.
प्रतिबंध: जपानी इंसेफेलायटीस लसीकरण. डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घेणे.
7. हँड-फूट-माऊथ डिसीज : सौम्य असतो पण कधी-कधी गंभीर न्यूरोलॉजिकल गुंतागुंत करू शकतो.
लक्षणे: तोंड, हात, आणि पायांवर फोड किंवा पुरळ आणि ताप, घसा खवखवणे.
प्रतिबंध: यामध्ये तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घ्या.
8. चिकनपॉक्स : सौम्य असतो, पण प्रतिकारशक्ती कमी असल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
लक्षणे: शरीरभर पुरळ आणि खाज येणे.
प्रतिबंध: चिकनपॉक्स लस.
9. इन्फ्लूएंझा व्हायरस : लहान मुलांमध्ये निमोनिया किंवा ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते.
लक्षणे: ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी.
प्रतिबंध: वार्षिक इन्फ्लूएंझा लस.
10. करोना व्हायरस : काही मुलांमध्ये सौम्य, पण घातक ठरू शकतो.
लक्षणे: ताप, सर्दी, अंगदुखी, आणि थकवा.
प्रतिबंध: मास्क, स्वच्छता, आणि कोविड लसीकरण.
‘या’ पूर्वी कोणते आजार होऊन गेले :
1. देवी : अत्यंत घातक आणि संसर्गजन्य आजार होता. यामध्ये शरीरावर फोड आणि मोठ्या प्रमाणावर मृत्यू घडवत असे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमामुळे 1980 मध्ये पूर्णतः नष्ट झाला.
2. पोलिओ : लहान मुलांमध्ये अपंगत्व आणि मृत्यू होण्याचे मुख्य कारण. पोलिओ व्हायरसमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होत असे. भारतात 2014 पासून पोलिओ पूर्णपणे निर्मूलन झाले आहे. आणि पोलिओ लसीकरणाने मोठी क्रांती केली.
3. डिप्थेरिया : घशाच्या संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास. लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त होते. डीपीटी लसीकरणामुळे प्रादुर्भाव खूपच कमी झाला.
4. काळा आजार : शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करणारा संसर्गजन्य आजार. बहुधा गरीब भागांमध्ये दिसत असे. प्रतिबंधात्मक उपायांमुळे आणि औषधोपचारामुळे मोठ्या प्रमाणावर नियंत्रित झाला आहे.
5. टेटनस : लहान मुलांमध्ये नाळ कापताना स्वच्छता नसल्यामुळे होणारा गंभीर जीवाणूजन्य आजार. स्नायूंचे आकुंचन आणि मृत्यू होण्याची शक्यता. ‘टीटी’च्या लसीकरणामुळे नवजात टेटनस जवळजवळ नष्ट झाला आहे.
6. यवानी ताप : लहान मुलांमध्ये तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास, आणि कधी-कधी मृत्यू होतो. डीपीटी लसीकरणामुळे याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
निष्कर्ष काय सांगतो?
भारतातील लहान मुलांसाठी निमोनिया, डायरिया, आणि कुपोषण हे एकत्रितपणे सर्वात मोठे धोके निर्माण करतात. तथापि, योग्य लसीकरण, स्वच्छता, योग्य आहार, आणि प्राथमिक आरोग्यसेवा मिळाल्यास या आजारांपासून लहान मुलांचा बचाव करता येतो. डॉक्टर देखील पालकांना याच गोष्टींची काळजी घेण्यास नेहमी सांगत असतात.
यासाठी कार्यालयांची सफाई करा, अनावश्यक कागदांचे ढीग रिकामे करा, वाहनांचे भंगार साफ करा, पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. शाळेचा परिसर आणि मुलांच्या खेळण्याचा परिसर स्वच्छ ठेवा आणि त्यांचा रोजचा आहार चांगला ठेवा.
The post HMPV : भारतात ‘हे’ दोन विषाणू ठरले होते बालमृत्यूच मोठं कारण; तर ‘या’ 10 विषाणूंनी घातले थैमान, उपाय-लसीकरणाविषयी पाहा…. appeared first on Dainik Prabhat.
“}]]