14 महीने अंथरुणात असलेली आणि 43 वर्षीय 106 किलो वजनाची महिला सिंगल स्टेज बायलॅटरलहिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर पाहिल्याच दिवशी चालू लागली मुंबईतील एक 43 वर्षीय महिला मधुमेह, स्थूलता (106 किलो वजन) आणि ऑस्टिओपोरॉसिसने पीडित होती. या सगळ्या दुखण्यांमुळे तिला चालायला, मांडी घालून बसायला, पायावर पाय टाकून बसायला त्रास होत असे इतकेच नाही, तर दैनंदिन कामे करण्यातदेखील अडचण येत होती. या कारणाने ती 14 महीने अंथरुणात होती.
एकदा मामुली धडपडल्यामुळे तिला बायलॅटरल इंट्राकॅप्स्युलर फ्रॅक्चर नेक ऑफ फीमर झाल्याचे समजले. ऑस्टिओपोरॉसिस, मधुमेह आणि स्थूलता यांसारख्या इतर समस्या देखील असल्याने हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात मोठा धोका होता आणि या धोक्यामुळे या रुग्णावर 14 महिन्यांपर्यंत कोणतेही उपचार केले गेले नाहीत.
शस्त्रक्रिया आणि त्यानंतर घेतलेल्या बारीक काळजीमुळे एका वर्षाने ही महिला आता संपूर्णपणे चालत्या-फिरत्या झाल्या आहेत. व आपली दैनंदिन कामे सहज करू शकतात. नानाविध समस्या असणाऱ्या रुग्णांमध्ये इंप्लांट प्रक्रियेचे महत्त्व व परिणामकता या केसच्या माध्यमातून दिसून आली.
या रूग्णाला उपचार देण्यासाठी मोठ्या धैर्याची गरज होती, कारण हा रुग्ण बराच काळ अंथरुणात होता.शिवाय या रुग्णात गंभीर स्वरूपाची पाय-दुखी, स्थूलता, व्हीटामिन, शर्करा आणि कॅल्शियमची कमी यांसारख्या जटिलता होत्या. शस्त्रक्रियेच्या आधीची पूर्ण आखणी केल्यावर आम्ही बायलॅटरल सिंगल स्टेज टोटल हिप जॉइंट रिप्लेसमेंट केली, त्यावेळी आम्ही सॉफ्ट टिशूजची बारीक काळजी घेतली व अशा प्रकारे एक यशस्वी बायलॅटरल टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली. मात्र त्याच दिवशी रूग्णाला चालते करणे हे तितकेसे सोपे नव्हते पण ती विश्वासाने चालू शकली.
या शस्त्रक्रियेत काहीही गुंतागुंत झाली नाही. एक वर्ष आणि 9 महिन्यांनी रुग्ण आता सक्रिय आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय स्वतंत्रपणे चालू शकत आहे.आता तिला आपले जे 104 किलो वजन आहे, ते कमी करण्यासाठी स्थूलतेची शस्त्रक्रिया करायची आहे.
स्वत: रुग्णाने सांगितले की, मी जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आले, तेव्हा मला अत्यंत वेदना होत होती आणि चालण्या-फिरण्याबाबत अनेक समस्या होत्या. एंडोक्रिनोलॉजिकल आणि ऑर्थोपेडिकसहित अनेक वैद्यकीय चाचण्या करूनही मुंबईतील कोणताच डॉक्टर माझ्या समस्यांवर ठोस उपाय सांगू शकत नव्हता. 14 महीने मी वेदना सहन केल्यानंतर सुदैवाने माझ्यावर चांगले उपचार झाले. डॉक्टरांनी माझ्या चालण्या-फिरण्याच्या समस्या सोडवण्यासाठी युनिलॅटरल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यास सुचविले. या उत्कृष्ट उपचारांमुळे मी आज स्वतंत्रपणे चालू शकत आहे आणि माझे सगळे काम स्वतः करू शकत आहे.
– डॉ. प्रदीप भोसले