Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

“चिंच’ असे नुसते नाव घेतले तरी तिच्या आंबट गोड चवीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटते. त्यातल्या त्यात गाभुळलेल्या चिंचेची गोडीच और!चिंचेचे झाड सदाहरित वृक्षांपैकी एक आहे. हे झाड कधीही पर्णरहित असत नाही. अत्यंत कडक उन्हाळा व पाण्याचे दुर्भिक्ष्य असले तरीही तग धरून राहते. ( tamarind benefits )

चिंचेच्या फळात सुमारे 3 ते 10 लालसर तपकिरी रंगाचे द्विदल चिंचोके असतात. बंदुकीच्या दारूत वापरण्यासाठी आणि कोळसा तयार करण्यासाठी चिंचेचा वापर करतात. डांबर उकळून प्रामुख्याने पायरोगनियस आम्ल व इतर रसायने तयार करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो.

झाडाची साल ही लकवा किंवा शरीराच्या अवयवाची संवेदना शिथिल झाल्यास लेप करण्यासाठी वापरतात. तसेच सालीच्या राखेचा उपयोग अल्सर, स्त्रीरोग, लघवी होण्यास त्रास होणे यावरील औषधांमध्ये होतो. चिंचेच्या पानांचा उपयोग सूज कमी होण्यास, गजकर्ण, रक्ताचे विकार, दंतशूल, कर्णशुल, डोळ्याचे विकार, ट्युमर इत्यादी रोगांवर इलाज करण्यासाठी होतो.
तोंडाला चव आणणारी, स्वयंपाकघरात चिंच आवश्‍यक असते. आमटी आणि भाजीत चिंच वापरतात.

पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत. पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं.

चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर कुसकरून ते पाणी गाळून घ्यावं. पाणी अर्ध आटवावं. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा. हे सरबत रात्री प्याल्यानं सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार/सवय दूर होते.

चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.
रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्‍यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.

चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ / या प्रमाणात घ्याव्या. ( tamarind benefits )

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgirasea foodskintopnewsआरोग्य जागरआहारमानसिक आरोग्य
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar