Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची अशी घ्या काळजी

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2021
in आरोग्य वार्ता, लाईफस्टाईल
A A
हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची अशी घ्या काळजी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, विशेषकरून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण त्याची त्वचा ही मोठ्यांच्या तुलनेत अधिक नाजूक असते. हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेला अधिक पोषणाची गरज असते कारण तापमान कमी झाल्याने त्वचा कोरडी पडू लागते.  ( taking care of baby skin during winter )

हिमालया ड्रग कंपनी च्या डिस्कव्हरी सायन्सेस ग्रुपमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुभाषिणी एन. एस. यांनी सांगितले लहान मुलांचे गाल, गुढघे, नाक आणि कोपर हे अवयव हे अधिक कारडे असतात आणि थंडीमध्ये ते अधिक कोरडे होऊ लागतात. आपल्या त्वचेला नैसर्गिक असा एक ओलावा असतो आणि अतिशय कठोर अशी रसायने असलेल्या उत्पादनांचा वापर केल्यास त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे तुमच्या लहान मुलाच्या त्वचेची काळजी घेत असतांना नैसर्गिक घटक असलेली उत्पादने आपण वापरणे अधिक चांगले.
डॉ. सुभाषिणी यांच्या मते पालकांनी नेहमीच बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, कोरफड, विंटर चेरी, जेष्टमध, मध आणि दुधाने युक्त अशी उत्पादने वापरावीत. या सर्व वनस्पती /घटक हे घरगुती तर असतातच पण त्याच बरोबर यांमुळे त्वचेतील ओलावा त्वचेतच राहतो आणि त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची चांगली काळजी घेतली जाते.

मुलांना आंघोळ घालण्यापूर्वी तेलाने मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा अधिक चांगली मऊ राहण्यास मदत मिळते. हिवाळ्यात दोन दिवसांतून एकदा लहान मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालणे हितकारक असते. जर पाणी खूपच गरम असेल तर त्यामुळे त्वचेवरील संरक्षक स्तराला इजा होण्याची शक्‍यता असते. त्याचबरोबर लहान बाळाला अधिक काळ आंघोळ घातली तर त्यामुळे त्वचेतील ओलावाही निघून जाण्याची शक्‍यता असते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळीचा कालावधी कमी करावा. ( taking care of baby skin during winter )

आंघोळ झाल्यावर त्वचेची निगा राखण्यासाठी तसेच आतील ओलावा आतच ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. कंट्री मॅलो (बला) आणि लिकोराईस (जेष्ट्‌यमध) यांनी युक्त अशा बेबी क्रीमचा उपयोग केल्यास तुमच्या बाळाच्या त्वचेला ओलावा मिळण्या बरोबरच रक्षणही होते विशेषकरून गाल, गुडघे, नाक आणि घासली जाणारी कोपरे यांचेही रक्षण होते.

लहान मुलांना उबदार ठेवण्यासाठी चांगले उबदार कपडे वापरावेत. ँकेट्‌स मध्ये गुंडाळू नये कारण हे कपडे रखरखीत असतात त्यामुळे काही बाळांच्या संवेदनशील त्वचेला त्रास होऊन रॅशेस येऊ शकतात.( taking care of baby skin during winter )

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar