– साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे.
– सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात.
– ग्रीस किंवा वॉर्निशचे डाग टर्पेन्टाईलने जातात.
– कपड्यावर पानाचे डाग पडले तर लगेचच लिंबू कापून डागावर घासावेत, स्वच्छ पाण्यात धुवावे.
– कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवावे. डाग निघण्यास मदत होते.
– उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग पडतात. लिंबाच्या रसाने हे डाग घालविता येतात. लिंबाचा रस या डागांवर 10 मिनिटे लावून ठेवावा मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत.
– कपड्यांवरचे हळदी डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा, किंवा कपडे धुण्याची कोरडी पावडर त्यावर लावून घासून काढा.
– चहा, कॉफीचा पडलेला डाग प्रथम स्वच्छ धुवून घ्यावा मग जेथे डाग पडला आहे त्या भागावर बोरॅक्स पावडरची पेस्ट लावावी.
– चिखलाचा डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा मग डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावून थोड्या वेळाने डाग धुवावा.
– शाईचा डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून टाकावा.
– केस गळत असल्यास शुद्ध तिळाचे तेल केसांना लावावे.
– अनशापोटी रोज 1 चमचा तीळ चावून खावेत.
– रोज सकाळी एक लसूण पाकळी चावून खावी.
– रोज आंघोळीपूर्वी अर्धा ते 1 तास आधी कांद्याचा रस केसांना चोळावा. केस गळायचे थांबतात.
– एकाच जागी भांग ठेवल्यास तो फाटत जातो. यासाठी शक्य असेल तेवढी भांगाची जागा बदलावी. म्हणजे चेहराही वेगळा दिसतो.
– कॉटच्या कडेला मान मागे कडेखाली ठेवून प्रत्येक नाकपुडीत 3 ते 4 थेंब शुद्ध गाईचे तूप टाकावेत. केसांना फायदा होतो.
– कडिपत्त्याची 4 ते 5 पाने रोज चावून खावीत.
– संत्रे किंवा लिंबाची साले उकडून मिक्सरमधून काढून केसांच्या मुळाशी चोळावीत.
– शैलजा गोडांबे