ज्यावेळी स्त्रीस दिवस जातात किंवा गर्भ वाढीस लागतो तेव्हा सर्वप्रथम स्त्रीची मासिक पाळी बंद होते. लघवीला वारंवार लागणे, थकवा जाणवणे, अंग गळून गेल्यासारखे वाटणे, मांड्या गळून गेल्यासारख्या वाटणे, अंग जड होणे अशी लक्षणे जाणवू लागतात. काही स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर विशेषत: गालावर, कपाळावर आणि डोळ्यांभोवतीच्या त्वचेचा रंग बदलतो. काळसर चट्टा येतो. हा काळसर चट्टा डिलिव्हरीनंतर जातो. यालाच “प्रेग्रन्सी मास्क’ असे म्हणतात.
पोटावर बेंबीच्या खालच्या भागात तसेच मांडीवर वरच्या भागात वेगवेगळ्या लांबीच्या आणि रुंदीच्या रेघांच्या आकाराचे वलीविशेष तयार होतात. यांना “स्टॅरिया’ असे म्हणतात. गरोदरपणी आठवण म्हणून राहणाऱ्या लक्षणांपैकी या एक आहेत. या रेषा जशा गरोदरपणामध्ये येतात तसेच जर संपूर्ण अंगावर सूज आली असता, स्थूलपणा याकारणांमुळेही येऊ शकतात. योग्य प्रमाणात वाढणारे वजन आणि पोटाला नियमितपणे तेलाने मालिश केल्याने त्यांचे तयार होण्याचे प्रमाण कमी करता येते.
गरोदर असणाऱ्या स्त्रियांच्या गर्भाशयाचे वजन 50 ग्रॅम आणि उंची 7.5 सेंटीमीटर एवढी असते. तर गरोदर असणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे वजन 900 ते 1000 ग्रॅमपर्यंत वाढते आणि गर्भाशयाची उंची 35 सेंटीमीटरपर्यंत वाढते. ( weight gain in pregnancy )
गरोदरपणात सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये वजन कमी होते. नंतर मात्र वजन एकसारख्या गतीने वाढते. शेवटच्या एक किंवा दोन आठवड्यांमध्ये वजन न वाढता स्थिर राहते किंवा कधी कधी कमी होते. संपूर्ण गरोदपणामध्ये एकूण मिळून सरासरी 10 ते 12 किलो वजन वाढते. यापैकी सरासरी एक किलो वजन पहिल्या तीन महिन्यांत वाढते. नंतरच्या आणि शेवटच्या तीन महिन्यांत साधारणत: 5-5 किलो वजन वाढते. यापैकी गरोदर स्त्रीचे साधारणत: सहा किलो वजन वाढते; तर बाळाचे चार किलो.
प्लासेंटा, गर्भाशय, गर्भाशयातील बाळाभोवतीचे पाणी आणि स्तन यांचे सर्वांत मिळून साधारणत; सहा किलो वजन वाढते. संपूर्ण गरोदरपणाच्या काळात नियमित तपासणी करावी. यामध्ये वजन किती गतीने वाढते आहे. यावर लक्ष ठेवले जाते. जर ते एका विशिष्ठ ठरावीक गतीनेच वाढले पाहिजे, जर ते फार जास्ती गतीने वाढले किंवा सरासरीपेक्षा कमी राहिले तरी ते धोक्याचे असते. जर आठवड्याला 1/2 किलोपेक्षा जास्त किंवा महिन्याला दोन किलोपेक्षा जास्त वजन वाढत असेल तर ते गर्भवती स्त्रीला धोक्याचे ठरते.( weight gain in pregnancy )