पुणे – खरेतर कोणत्याही आजारात (Heart attack) आजार होऊ द्यायचा व नंतर उपचार करायचे, ही पद्धत चुकीचीच आहे. आजार होऊच नये यासाठी काळजी घेणे हे जास्त संयुक्तिक व सोपे पडते. म्हणूनच लहानपणापासून मुलांना योग्य आहाराची सवय लावली पाहिजे.
सर्व फळे व भाज्या दोडका, भोपळा, घेवडा, पडवळ, दुधी यासारख्या भाज्या खायला हव्यात.
जेवण, नाश्ता, रात्रीचे जेवण वेळच्यावेळी भूक लागेल तेव्हा घ्यावे. विकतच्या, प्रक्रियायुक्त अन्नापेक्षा जास्तीतजास्त पदार्थ घरी बनवून खावे. फरसाण मैदायुक्त बेकरी पदार्थ टाळावेत. (Heart attack)
आहारात ताजी फळे व मोसमानुसार मिळणाऱ्या फळांचा समावेश करावा. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, आंबा, फणस, करवंद, जांभळं हिवाळ्यात, द्राक्षे, सफरचंद पावसाळ्यात पेरू, चिक्कू, डाळिंब केळ कोणत्याही ऋतुत खावे सध्या बिगरमोसमी फळे पिकवली जातात. खाल्लीही जातात.
त्याऐवजी ऋतुप्रमाणे मोसमाप्रमाणे फळे खावीत. परदेशात परदेशी फळं खावीत. ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशात ती ती फळे अवश्य खावीत. सध्या मुबलक प्रमाणात परदेशी फळे केव्हाही बाजारात असतात. “आम्ही तीच खातो’ हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते; परंतु एतद्देशीय फळेच जास्त करून खावीत व आपल्याच भाज्यांचा आहारात समावेश करावा. थंडीत सर्व भाज्या खायला हरकत नाही, पण एरव्ही खास पावसाळ्यातील भाज्या उन्हाळ्यातील भाज्याच त्या त्या ऋतूत खाव्यात.
2/3 तासांनी खावे. थोडे खावे चावून चावून खावे.
ज्वारी, बाजरी, राजगिरा, पांढरी, तांबडी नाचणी, स्थानिक तांदूळ, हातसडीचा ब्राऊन सालासह असलेला तांदूळ, गहू या पूर्ण धान्याचा समावेश आहारात असावा. मैदा, रिफाईंड तेल, पांढरा तांदूळ, पांढरी साखर नको.
सालासह डाळी खाव्यात मूग, तूर, उडीद.
तेलाचा वापर माणसी 1/2- 3/4 कि. प्रती महिना हे प्रमाण असावे तेले आलटून पालटून खावीत (घाण्यावरचे तेल खावे यांत्रिक नको) बहुतांश घरात गव्हाच्या पोळ्याच तिन्ही त्रिकाळ खाल्ल्या जातात. त्याऐवजी रात्री मिश्रपिठांची/भाजणीची भाकरी व पालेभाजी खावी. मधुमेह व रक्तदाब आटोक्यात ठेवावा.