[[{“value”:”
Heart attack : धाप लागते , श्वासोच्छवासाला त्रास होतो , छातीत धडधडते , छातीत दुखते , चक्कर येते उलटी, मळमळ , हातापायांची शक्ती गेल्यासारखे वाटते, छातीत घट्ट आवळल्यासारखे वाटते. चालताना धाप लागते. एका दमात चालताना, जिने चढताना धाप, दम लागतो.
असे असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. पोटात गॅस झाल्यासारखे वाटते. मात्र, असे झाल्यास घरगुती उपाय करून दुखणे कमी झाले नाही तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे हृदयविकाराचे गंभीर लक्षण असू शकते.
मानवाचे हृदय एक पोकळ मांसपेशीनी बनलेला शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याचा आकार बंद मूठीएवढा असतो. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्याच ह्रुदयाला प्राणवायू (आँक्सिजन )चा देखिल पुरवठा करतात.
– प्रत्येक मिनिटाला 72 वेळा ह्रुदयाचे आकुंचन प्रसारण होत असते. दिवसांत एक लाख वेळा आपले ह्रदय धडकते.
– आपला आहार विहार व वयोमानानुसार आपल्या रक्त वाहिन्यामध्ये शरीरातील चरबीचे कण जमा होत जातात व त्यामुळेच रक्तवाहिन्यामध्ये अवरोध निर्माण होत जातात. या अवरोधामुळेच हृदयाला प्राणवायू व रक्ताचा पुरवठा कमी होतो.रक्त वाहिन्या संकुचित होण्यामुळे हृदय विकार होण्याचा धोका निर्माण होतो.
– हृदय विकारासाठी पुढील कारणेही कारणीभूत असतात. धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल,शारीरिक श्रमाचा अभाव,अनुवांशिकता,ताणतणाव, रागीटपणा यामुळे देखील ह्रुदय विकार होतो.
लक्षणे :
सामान्यतः छातीच्या मध्य भागात तीव्र वेदना, श्वासोच्छ्वासास त्रास होणे,घाम येणे,मळमळ व चक्कर येणे,वेदना छातीपोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात.
तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जातात .ही लक्षणे सुमारे वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकतात काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो व रक्तदाब कमी होवून म्रुत्यु येतो.
ह्रुदय विकारापासून बचाव :
– ह्रुदय विकारापासून ज्यांना धोका आहे किंवा ह्रुदय विकारापासून ज्यांना स्वतः ला वाचवायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत.
आपल्या आहारात मीठ व चरबीचे प्रमाण कमी असावे फायबर व कार्बोहायड्रेट्स उच्च मात्रेत असावे.
– ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी वजन कमी करावे.
– रोज सकाळी शारिरीक व्यायाम करणे गरजेचे असते.
– धूम्रपान व मद्यपान करीत असल्यास त्वरित बंद करणे.
– मधुमेह, रक्तदाब, आणि कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर रोजची औषधे घेणे.
The post Heart attack : हृदय सांगतंय काहीतरी.! ‘ही’ लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान appeared first on Dainik Prabhat.
“}]]