[[{“value”:”
Heart Attack Symptoms : हृदयविकार हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, ज्याचा धोका गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढताना दिसत आहे. सर्व वयोगटातील लोकांनी हृदयाच्या आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे आहे. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका तरुणांमध्येही दिसून येत आहे, हे निश्चितपणे मोठ्या धोक्याचे लक्षण आहे.
जीवनशैली आणि आहारातील गडबडीमुळे हृदयाच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. हृदयविकार येण्यापूर्वी काही लक्षणं दिसून येतात पण ही लक्षणं सामान्य वाटली त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज आपण याच काही सामान्य दिसणाऱ्या लक्षणांकडे एक नजर टाकणार आहोत….
– हृदयविकार हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. बदलती जीवनशैली, व्यायाम आणि पोषक आहाराचा अभाव, वाढते ताण-तणाव आदी कारणांमुळे हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. हार्ट अटॅक अर्थात हृदयविकाराचा झटका हा जीवघेणा मानला जातो. हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येकडं वेळेवर लक्ष दिलं नाही, तर हार्ट अटॅकची शक्यता वाढते.
– खांदे किंवा मान दुखणं हे हार्ट अटॅक येण्यापूर्वीचं सामान्य लक्षण आहे. अनेकदा मान आणि खांद्यांच्या आसपास वेदना जाणवतात. छाती दुखण्यासह खांदे किंवा मानेजवळचा भाग दुखत असेल किंवा छातीपेक्षा खांदा आणि मानेत वेदना जास्त असतील तर अशी स्थिती सामान्य नक्कीच नसते. त्यासाठी तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– मळमळणं, उलट्या होणं ही देखील सामान्य समस्या आहे. सर्वसामान्यपणे पोटाशी संबंधित आजारामुळे ही लक्षणं दिसतात. पण काही वेळा हृदयविकारामुळे अस्वस्थ वाटणं, मळमळ किंवा उलटी होणं अशी लक्षणं दिसतात. काही लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी उलटीसारखे संकेत जाणवू लागतात.
– हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुम्हाला छातीत दुखणं तसेच दम लागणं यासारख्या समस्या जाणवू शकतात. जेव्हा हृदय पुरेशा प्रमाणात शरीरातील विविध अवयवांना रक्तपुरवठा करू शकत नाही, तेव्हा अवयवांमधील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागते. ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागताच आपलं शरीर त्यावर प्रतिक्रिया देतं आणि अधिक ऑक्सिजन घेण्यासाठी श्वासोच्छवासाचा वेग वाढवतं. या क्रियेमुळे दम लागतो.
– जर तुम्हाला छातीत दुखण्यासह चक्कर येत असेल तर हे संकेत चांगले नाहीत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हार्ट अटॅकपूर्वी हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि मेंदुपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही वेळा चक्कर येणं, बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात. अशी कोणतेही लक्षणं दिसून आली तर तातडीने आरोग्य डॉक्तरांचा सल्ला घ्या.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
हृदयविकार टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारातील पोषणमूल्यांची काळजी घेणे. आहारात फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, नट, मासे, पोल्ट्री यांचा समावेश आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावे, कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये किंवा कमी करू नये हे महत्त्वाचे आहे. लाल आणि प्रक्रिया केलेले मांस, कार्बोहायड्रेट्स, जोडलेली साखर आणि सोडियम असलेले पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
व्हिटॅमिन डीची कमतरता :
ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे त्यांना हृदयविकाराचा झटका, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, परिधीय धमनी रोग आणि स्ट्रोक यासारख्या समस्या विकसित होण्याचा धोका जास्त असतो. या स्थितीमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आहारात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन बी-12 कडे लक्ष द्या :
व्हिटॅमिन डी प्रमाणेच, हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 देखील आवश्यक आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोरोनरी रोग, मायोकार्डियल इन्फेक्शन, स्ट्रोक आणि इतर रक्ताभिसरण आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता शरीरातील इतर अनेक प्रकारच्या धोक्यांमध्ये एक घटक असू शकते, हे जीवनसत्व असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
फोलेटची कमतरता :
शरीरात फोलेटची कमतरता हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग कार्डिओ-व्हॅस्क्युलर डिसीजचा धोका वाढवू शकते. कार्डिओ-व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदय किंवा रक्तवाहिन्यांचे आजार. फोलेटच्या कमतरतेच्या बाबतीत, शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
The post Heart Attack : हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ‘हे’ बदल; सतर्क राहा, वेळीच वाचेल तुमचा जीव ! appeared first on Dainik Prabhat.
“}]]