Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Healthy Tips : फळ की फळांचा रस? आरोग्यासाठी नेमकं काय जास्त फायदेशीर?

by
January 27, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Healthy Tips : फळ की फळांचा रस? आरोग्यासाठी नेमकं काय जास्त फायदेशीर?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Healthy Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण योग्य आणि संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा अशा समस्या वाढताना दिसतात. आरोग्य टिकवण्यासाठी रोजच्या आहारात फळांचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो फळ खावं की फळांचा रस प्यावा? याबाबत आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात, ते जाणून घेऊया.

फळ खाणं हे फळांच्या रसापेक्षा जास्त फायदेशीर ( Healthy Tips)

बहुतेक लोकांना वाटतं की फळांचा रस पिणं अधिक आरोग्यदायी आहे. पण प्रत्यक्षात फळ थेट खाणं हे रस पिण्यापेक्षा जास्त फायदेशीर असतं. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी तसेच निरोगी लोकांसाठीही फळ खाणं उत्तम मानलं जातं.

फळांचा रस पिण्याचे तोटे

1. फळांच्या रसामध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढू शकते.

२. बाजारात मिळणाऱ्या पॅक्ड जूसमध्ये अतिरिक्त साखर असते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.

3. एक ग्लास जूस पिल्यावर शरीराला जास्त कॅलरीज मिळतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं.

4. जूस काढताना फळातील फायबर निघून जातं, त्यामुळे साखर थेट रक्तात जाते आणि शुगर लेव्हल लवकर वाढते.

5. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी बाहेरचे पॅक्ड जूस टाळावेत. जूस घ्यायचाच असेल तर तो ताजा आणि घरचा असावा.

 

फळ खाण्याचे फायदे

फळांचा रस न घेता फळ थेट खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

1. फळांमधून आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

2. फळांमध्ये भरपूर फायबर असतं. हे फायबर साखर हळूहळू रक्तात मिसळायला मदत करतं, त्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत नाही.

3. भूक लागल्यावर फळं खाल्ल्याने पोट भरतं आणि जंक फूड खाण्याची सवय कमी होते.

4. फळांमधील गोडवा नैसर्गिक असतो. योग्य प्रमाणात फळं खाल्ल्यास ती शरीराला ऊर्जा देते, नुकसान करत नाही.

सर्वांसाठी फळांचं सेवन आवश्यक

मधुमेह असो किंवा नसो, सर्व लोकांसाठी फळ खाणं फायदेशीर आहे. फळं ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायला मदत करतात आणि संपूर्ण शरीर निरोगी ठेवतात. तुमच्या ओळखीत कोणी मधुमेहाने त्रस्त असेल, तर ही माहिती त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.

थोडक्यात सांगायचं तर रोज फळ खा, जूसपेक्षा फळांना प्राधान्य द्या आणि आरोग्य टिकवा.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar