सध्या सर्वत्र मॉडर्न किचनचा ट्रेंड सुरु आहे. मॉडर्न किचन म्हटले की त्यात आकर्षक रंगसंगतीतील नॉनस्टीक भांडी आलीच. मात्र या नॉनस्टीक भांडी वापरण्याचे तोटे लक्षात घेता अनेक लोकांनी आरोग्य आणि चवीचा विचार करून मातीची भांडी पुन्हा घरात वापरायला सुरुवात केली आहे.
सध्या मंडईसह ऑनलाईन खरेदीतही ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये हंडी, कढई, कुकर अशा वस्तू छान आकारात आणि लाल आणि काळ्या रंगात बाजारात आहेत. मात्र या मातीच्या भांड्यांचे फायदे तुम्हाला माहीत आहे का? तर जाणून घेऊया मातीच्या भांड्यांचे फायदे…
फायदे
-ॲल्युमिनिअमच्या भांड्यात तसेच पितळ्याच्या भांड्यात पदार्थ शिजवल्याने त्यातील ८७ टके पोषक तत्व नष्ट होतात. मातीच्या भांड्यातील पदार्थांमध्ये मात्र १०० टक्के पोषण कायम राहते, असे जाणकार सांगतात.
-मातीच्या भांड्यातील पदार्थ हे अधिक रूचकर आणि चविष्ट लागतात. तसंच यातील मातीचा सुगंध तुमच्या पदार्थांमध्ये उतरतो. त्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद तुमच्या जीभेवर तरळतो.
-मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सल्फर हे घटक मिळतात. आम्लपित्ताची पातळी वाढत नाही. पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत. तेलाचा वापरही कमी होतो. त्यामुळे ती योग्य आहेत.
-प्रत्येक पदार्थ मातीच्या भांड्यात तयार करणं शक्य नाही, मात्र रोज भात अथवा वरण चपाती बनवा आणि आपलं आरोग्य निरोगी बनवण्यासाठी एक पाऊल नक्की उचला.