Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Health Tips: हिवाळ्यात रोज सकाळी कोमट पाणी प्या; पचन सुधारेल, सर्दी-खोकल्यातूनही मिळेल दिलासा

by
December 15, 2025
in लाईफस्टाईल
A A
Health Tips: हिवाळ्यात रोज सकाळी कोमट पाणी प्या; पचन सुधारेल, सर्दी-खोकल्यातूनही मिळेल दिलासा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Health Tips: हिवाळ्यात बहुतेक लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे ही एक सोपी, स्वस्त आणि अत्यंत फायदेशीर सवय आहे. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीही याला चांगली सवय मानतात.

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे आतले तापमान हळूहळू वाढते. त्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि शरीरातील घाण (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. रात्री झोपेत शांत झालेल्या शरीराच्या अवयवांना हे पाणी जागं करण्याचं काम करतं.

थंड पाणी प्यायल्यावर शरीराला ते गरम करण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. पण कोमट पाणी प्यायल्याने ही ऊर्जा वाचते. यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो, त्वचा हायड्रेट राहते आणि सर्दी-खोखल्यापासूनही आराम मिळतो.

पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून सुटका

सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्यायल्याने आतड्यात साचलेली घाण मऊ होते आणि शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पचनसंस्थेत रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे अन्नाचे पचन आणि शोषण चांगले होते. वजन नियंत्रणासाठीही हे उपयुक्त ठरते.

सर्दी-खोखला आणि घशाच्या दुखण्यात आराम

हिवाळ्यात कोमट पाणी पिल्याने घशात साचलेला कफ पातळ होतो. नाक बंद होणे, घसा खवखवणे, दुखणे अशा त्रासात लवकर दिलासा मिळतो.

रक्ताभिसरण सुधारते, शरीर डिटॉक्स होते

कोमट पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या रुंदावतात आणि ब्लड सर्कुलेशन सुधारते. त्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक घटक शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात पोहोचतात. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

स्नायूंना आराम, वेदना कमी होतात

कोमट पाणी शरीरातील स्नायूंना, विशेषतः पोटाच्या स्नायूंना, आराम देते. डोकेदुखी, मासिक पाळीतील पोटदुखी यामध्येही याचा फायदा होतो. शरीर हायड्रेट राहिल्याने डिहायड्रेशनमुळे होणारी डोकेदुखी कमी होते.

ही माहिती विविध वैद्यकीय अहवालांवर आधारित आहे. कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Join our WhatsApp Channel

The post Health Tips: हिवाळ्यात रोज सकाळी कोमट पाणी प्या; पचन सुधारेल, सर्दी-खोकल्यातूनही मिळेल दिलासा appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar