[[{“value”:”
health tips: केळी हे एक असं फळ आहे जे चविष्ट, ऊर्जा देणारं आणि सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध असतं. बरेच लोक नाश्त्यामध्ये किंवा व्यायामानंतर केळी खातात. पण एक प्रश्न नेहमी पडतो केळी रिकाम्या पोटी खावीत का?
या विषयावर अनेकांचे वेगवेगळे अनुभव आहेत. काहींसाठी ते फायदेशीर ठरतं, तर काहींना त्रास होतो. खरं म्हणजे केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ली, तरच त्याचा शरीरावर शंभर टक्के चांगला परिणाम होतो.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने होणारे त्रास
केळामध्ये मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे काही लोकांना रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यानंतर,
आम्लपित्त (अॅसिडिटी)
गॅस किंवा पोटफुगी
मायग्रेन किंवा डोकेदुखी वाढणे
रक्तातील साखरेची पातळी वाढणे
असे त्रास होऊ शकतात.
म्हणूनच ज्यांना अॅसिडिटी, गॅस, डायबिटीज किंवा पोटाच्या समस्या आहेत, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणं टाळावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
केळी खाण्याची योग्य वेळ
नाश्त्यात केळं खायचं असल्यास ते ओटमील, दही, सुकामेवा किंवा दूधासोबत खाणं उत्तम.
व्यायामापूर्वी अर्धा तास किंवा व्यायामानंतर लगेच केळं खाणं शरीराला आवश्यक ऊर्जा देतं.
दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी केळं खाल्लं तर पचन सुधारतं आणि शरीर ताजंतवानं राहतं.
मात्र रात्री केळं खाणं टाळावं, कारण आयुर्वेदानुसार केळं थंड प्रकृतीचं फळ आहे आणि रात्री ते पचायला जड जातं.
थोडक्यात सांगायचे झाल्यास,
रिकाम्या पोटी केळी खाणं काहींसाठी हानिकारक ठरू शकतं.
अॅसिडिटी, डायबिटीज, गॅस किंवा पोटाच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
केळी दिवसाच्या वेळेत, विशेषतः व्यायामानंतर किंवा नाश्त्यासोबत खाल्ली तर अधिक फायदेशीर ठरते.
The post health tips: रिकाम्या पोटी केळी खाणं ठरू शकतं धोकादायक! जाणून घ्या केळी खाण्याची योग्य वेळ appeared first on Dainik Prabhat.
“}]]
