Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Health Tips: उठताच चक्कर येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय

by
January 27, 2026
in लाईफस्टाईल
A A
Health Tips: उठताच चक्कर येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Health Tips: कधी कधी झोपेतून किंवा बसलेल्या अवस्थेतून अचानक उभं राहताच डोळ्यांसमोर अंधारी येते, डोकं गरगरतं किंवा तोल जातो. बहुतांश लोक हे थकवा, अशक्तपणा किंवा कमी झोप यामुळे होतं असं समजून दुर्लक्ष करतात. पण वैद्यकीय भाषेत ही स्थिती ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणून ओळखली जाते आणि ते कधी कधी गंभीर आजाराचेही संकेत असू शकते.

असं का होतं?

आपण अचानक उभे राहिलो की गुरुत्वाकर्षणामुळे रक्त वेगाने पायांकडे जातं. निरोगी शरीरात नर्व्हस सिस्टिम त्वरित हृदयाचे ठोके वाढवते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे मेंदूपर्यंत पुरेसं रक्त पोहोचतं.

पण ही प्रक्रिया जर मंद झाली, शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा रक्तदाब अचानक कमी झाला, तर काही क्षणांसाठी मेंदूला पुरेशी ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे चक्कर येते.

उभे राहताच चक्कर येण्यामागची संभाव्य कारणं

शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया)
व्हिटॅमिन B12 ची कमतरता
लो ब्लड शुगर
रक्तदाबाच्या गोळ्या
हृदयाच्या झडपांचे आजार
काही वेळा पार्किन्सन्ससारखे नर्व्हस सिस्टिमचे आजार

हा हृदय किंवा नसांचा इशारा तर नाही ना?

जर ही समस्या वारंवार होत असेल, तर ते गंभीर असू शकते. याचा अर्थ रक्तदाब नियंत्रित करणारी शरीरातील यंत्रणा नीट काम करत नाही. सतत चक्कर येणं म्हणजे हृदयाची धडधड अनियमित असणे किंवा नसांचं नुकसान झाल्याचाही संकेत असू शकतो. यामुळे अचानक पडण्याचा धोका वाढतो, जो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो.

या समस्येपासून बचावासाठी काय कराल?

हळूहळू उठा – आधी बसून घ्या, मग सावकाश उभे राहा
पुरेसं पाणी प्या – दिवसभर शरीर हायड्रेट ठेवा
मीठाचं संतुलन ठेवा – डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात बदल करा
व्यायाम करा – पायांच्या स्नायूंना बळकट करणारे व्यायाम उपयोगी ठरतात

शरीराचे संकेत ओळखा

अचानक चक्कर येणं ही किरकोळ गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका. काळजी घेतल्यानंतरही चक्कर येत राहिल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज असल्यास टिल्ट टेबल टेस्ट किंवा रक्ततपासणी करून घ्या.

लक्षात ठेवा शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. त्या संकेतांकडे वेळेत लक्ष दिलं, तरच आरोग्य सुरक्षित राहील.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar