Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सांध्यांचे आरोग्य : हिवाळ्यात सांध्यांचे रक्षण

by प्रभात वृत्तसेवा
February 11, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जर तुम्हाला आर्थ्राइटिस म्हणजे संधिवाताचा त्रास असेल, तर हिवाळा ऋतू तुमच्यासाठी वेदनादायक ठरू शकतो. त्याचे कारण म्हणजे गार वातावरणामुळे हात थंडगार पडणे किंवा पाय दुखणे. वातावरणातल्या गारठ्यामुळे तुमच्या हाता-पायातील रक्तप्रवाह केंद्राशी एकवटून राहतो व त्यामुळे हाता-पायात पुरेशी उष्णता राहात नाही. संधिवाताने प्रभावित असलेले सांधे थंडीत आखडतात कारण, सांध्यांमधील प्रवाही हव्या तितक्‍या सहजपणे फिरू शकत नाही.

मनुष्याचे हात आणि मनगट यांमध्ये एकंदर 25 सांधे असतात, व त्यामुळे संधिवाताने ते प्रभावित होण्याची शक्‍यताही तितकीच जास्त असते. त्यामुळे, संधिवाताच्या रुग्णांनी अधिक दक्ष राहून विशेष काळजी घेतली पाहिजे.

गार हवा आणि हात गारठण्याचे वेगवेगळे भयानक दुष्परिणाम असतात, जसे की, हाताचे कौशल्य, पकड, जोर आणि संवेदनशीलता कमी होणे. गार हवेच्या सतत संपर्कामुळे फ्रॉस्टबाइट आणि नेक्रॉसिस (गारठल्यामुळे ऊतींना होणारी दुखापत) देखील होऊ शकते. 30 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये हे सर्वाधिक होत असल्याचे आढळते. हातापायाच्या बोटांना मुंग्या येणे हा धोक्‍याचा इशारा असतो, जो सुचवतो की, तुमच्या शरीराला ऊबेची गरज आहे.

सतत जाणवणारी अस्वस्थता आणि वेदना असल्यास एक्‍स-रे सहित नियमित तपासण्या करणे तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

हात आणि पायाच्या वेदनेसाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यायची काळजी:

सर्वात महत्त्वाचे म्हणजे थंडीच्या ऋतुत आपले हात आणि पाय ऊबदार ठेवा आणि सांधे आखडू नयेत यासाठी करण्याचा सोपा उपाय म्हणजे हातमोजे व पायमोजे घाला.

हातापायाची हालचाल करत राहा. हालचालीमुळे हाता-पायात रक्तप्रवाह व्यवस्थित राहील. शारीरिक हालचालींमुळे तुमचे शरीर ऊबदार आणि तरतरीत राहील. तुम्हाला जेव्हा वेदना किंवा अस्वस्थता जाणवेल, तेव्हा एखादा बॉल घट्ट दाबणे, हात व पाय एकमेकांवर चोळणे यांसारख्या साध्या व्यायामामुळे रक्ताभिसरण पूर्ववत होण्यास मदत होईल.

हात आणि पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्याने किंवा गरम पाण्याखाली हात व पाय धरल्याने ते शिथिल होतील व तुम्हाला बरे वाटेल. गरम पॅराफीन सकन खूप लाभदायक ठरू शकते, विशेषतः वयोवृद्धांचे रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी त्याची मदत होऊ शकते.

मॉईश्‍चराईझिंग लोशन किंवा तेल त्वचेसाठी मदतरूप होऊ शकते, ते थंडीत पायाच्या भेगांना प्रतिबंध करण्यासाठी देखील मदतरूप असते व सांध्यांमधील वेदना कमी करण्यास देखील मदत करते. अशी विविध क्रीम्स मिळतात, जी दाह कमी करणारी असतात व ती सांध्यांच्या वेदनेवर देखील प्रभावी असतात. परंतु, त्यातील एखादे निवडण्यापूर्वी आपल्या डोक्‍टरांचा सल्ला अवश्‍य घ्या.

हातातील वेदनेपासून आराम देण्यासाठी तुमचा आहार आणि अन्न देखील महत्त्वाची भूमिका बजावते. आहारात दाह-विरोधी पदार्थ सामील केल्यास मदत होऊ शकेल. त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, नट्‌स, बेरीज्‌ आणि मासळी यांचा समावेश असू शकतो. या सर्वांमुळे दाह कमी आणि नियंत्रित होतो, असे आढळून आले आहे.

– डॉ. प्रदीप भोसले

 

Tags: aarogya jagar
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar