[[{“value”:”
Tonsillitis | Health News : जेव्हा हवामान बदलतं तेव्हा फ्लू आणि विषाणूजन्य संसर्गामुळे घसा खवखवण्याच्या तक्रारी उद्भवतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, टोन्सिलायटिस म्हणजेच घशामध्ये जळजळ होणे यासारख्या आजार होतात.
घसादुखीसाठी बाजारू गोळयांऐवजी काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत, जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घसादुखी आणि टॉन्सिलदुखीवर लगेच आराम मिळेल….
घसादुखी आणि टॉन्सिलदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय कोणते? वाचा सविस्तर…
– आजार बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात.
– याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून-मधून कोरडा खोकला येतो. घशात/ टॉन्सिलमध्ये टोचल्यासारखे वाटणे या तक्रारी प्रमुख असतात.
कारणे :
विषाणू किंवा जिवाणूमुळे घसादुखी, टॉन्सिलसूज होतात. ब-याच वेळा सर्दी-पडशानंतर हे दुखणे येते. हा आजार सांसर्गिक आहे. याशिवाय रासायनिक प्रदूषण, घशास ताण, इत्यादी कारणांमुळे घसा सुजतो.
रोगनिदान :
– घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठया दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.
– कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.
– घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळयातल्या रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.
– कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र तज्ज्ञाकडे पाठवणे योग्य ठरेल.
उपचार :
गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. बऱ्याच वेळा केवळ एवढ्या उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.
– जंतुदोष आटोक्यात आणण्यासाठी ऍमॉक्सी गोळया उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.
– टॉन्सिलसुजेवर हळदपूड लावणे हा चांगला उपाय आहे. आपला अंगठा थोडा ओला केल्यास अंगठयास हळद चिकटते. मोठया माणसांना स्वतःच्या अंगठयाने टॉन्सिलवर हळद लावणे सहज शक्य आहे.
– लहान मुलांना घशात हळद लावताना मात्र थोडे कौशल्य लागते. यासाठी आपल्या अंगठयावर किंवा ओल्या कापसाच्या बोळयावर हळदपूड घेऊन, मुलाचे तोंड उघडून चटकन हळदपूड टॉन्सिलवर लावावी.
– सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यात मीठ-हळद मिसळून गुळण्या कराव्यात. याप्रमाणे दोन-तीन दिवस उपाय करावा.
– मध-हळद चाटण हा देखील एक चांगला उपाय आहे.
– घसादुखीसाठी बाजारू गोळयांऐवजी अर्धा चमचा जिरे + एक चमचा साखर तोंडात धरल्यास त्याचा रस पाझरून घसादुखी कमी होते. साखर लवकर विरघळते म्हणून आणखी एक-दोन वेळा घ्यायला हरकत नाही. हा उपाय लवकर केल्यास बहुतेकदा घसादुखी इतर काही न करता थांबते. खूप ताप, जास्त आजार असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.
The post Health News : घसा खवखतोय? घसादुखी आणि टॉन्सिलदुखीवर ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय करा, झटपट मिळेल आराम appeared first on Dainik Prabhat.
“}]]