Age Weight Chart | Health news : या जगात प्रत्येकाला फीट आणि फाईन रहायला आवडतं. वाढलेलं वजन किंवा लठ्ठपणा हा कोणालाच आवडत नाही. यासाठी प्रत्येकजण प्रचंड मेहनत घेतो. अनेक वेळा लोक वय आणि उंचीनुसार वजनाची मोजमाप करतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुमचं वजन आपली जीवनशैली, शरीराचा प्रकार, दैनंदिन व्यवहार यावर अवलंबून असतं. मात्र वय आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे? हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
आणि ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतं. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या उंची आणि वयानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे.
उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे :
150 cm : सामान्य वजन 43 – 57 किलो
155 cm : सामान्य वजन 45 – 60 किलो
160 cm : सामान्य वजन 48 – 62 किलो
165 cm : सामान्य वजन 51 – 65 किलो
170 cm : सामान्य वजन 54 – 68 किलो
175 cm : सामान्य वजन 57 – 72 किलो
180 cm : सामन्य वजन 60 – 75 किलो
185 cm : सामान्य वजन 63 – 78 किलो
उंचीनुसार पुरुषांचं किती वजन असलं पाहिजे :
160 cm : सामान्य वजन 50 – 65 किलो
165 cm : सामान्य वजन 53 – 68 किलो
170 cm : सामान्य वजन 56 – 71 किलो
175 cm : सामान्य वजन 59 – 75 किलो
180 cm : सामान्य वजन 62 – 79 किलो
185 cm : सामान्य वजन 65 – 83 किलो
190 cm : सामान्य वजन 68 – 87 किलो
195 cm : सामान्य वजन 71 – 91 किलो
जास्त वजन असणं धोकादायक:
जास्त वजनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्याचा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होतो.शिवाय लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर,मधुमेह, हार्मोनल असंतुलन, हृदयविकार यांसारख्या समस्या भेडसावण्याची शक्यता असते.
जन कमी असेल तर?
कमी वजनामुळेही देखील अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शरीराचे वजन सामान्यपेक्षा कमी असल्यास त्याचा परिणाम शरीरातील ऊर्जा, हाडं, स्नायू यांच्यावर होतो. तसेच रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते.
The post Health News : उंचीनुसार, तुमचं वजन किती पाहिजे? तुम्हीच पाहा आणि जाणून घ्या…. appeared first on Dainik Prabhat.