आपल्यापैकी अनेकांना डायरी ( benefits of health diary ) लिहून ठेवायची सवय असते. दिवसभरात घडलेल्या घटना, मनात आलेल्या भावना त्या डायरीत टिपल्या जातात. काहीजण नियोजनही डायरी ( benefits of health diary ) त लिहून ठेवतात. तर काहीजण हिशोब. अशीच एक डायरी ( benefits of health diary ) आपल्याला आरोग्यासाठी ठेवता येईल. ती असेल आपली व कुटुंबाची आरोग्य डायरी ( benefits of health diary ) . घरात ही डायरी ( benefits of health diary ) सगळ्यांना माहीत असेल अशा ठिकाणी ठेवता येईल. सगळ्यांची एक असू शकते किंवा प्रत्येकाची वेगवेगळीही. त्यात आपण काय नमूद करायचे तर आपल्या तब्येतीविषयी.
एखाद्या दिवशी आपलं डोकं दुखतं. एखाद्या दिवशी हात-पाय दुखतात. असं सतत काही तरी चालू असते. पण, रोजच्या कामाच्या धबाडग्यात आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुखणं तत्कालीन असेल तर लगेच थांबतही. पण, एखाद्यावेळेस हे दुखणे म्हणजे दुसऱ्या एखाद्या दुखण्याची लक्षणेही असू शकतात. पण, आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे आपल्या ते लक्षात राहत नाही.
त्यापेक्षा समजा आपण त्या-त्या दिवशी डायरी ( benefits of health diary )त तब्येतीविषयी लिहले तर महिन्यात नंतर आपल्या लक्षात येईल की, आपले डोकं किती दिवस दुखले किंवा हात-पाय किती दिवस दुखले. किंवा इतर कोणते दुखणे वाढले, कमी झाले. त्याप्रमाणे डॉक्टरांना आपण व्यवस्थित सांगू शकू.
या डायरी ( health benefits of dairy ) तुम्ही घेत असलेल्या औषधांबद्दलही लिहू शकता. म्हणजे डॉक्टरांकडे जाताना तुम्ही आधी कोणत्या महिन्यात कोणती औषधे घेतली होती, हे ही डॉक्टरांना कळू शकेल. त्याचबरोबर तुमचे वजन, तुमची झालेली चेकअप्स्, डॉक्टरकडे कधी कधी गेलो होतो, त्यांनी काय सल्ला दिला, बीपी-शुगर असल्यास त्याचे आकडे आदीही लिहून ठेवू शकता.
याच डायरी ( health benefits of dairy ) तुम्ही तुमच्याजवळच्या किंवा शहरातील सर्व दवाखान्यांचे फोन नंबर लिहू शकता. ऍम्बुलन्स, नेत्रपेढी, रक्तपेढी हे नंबरही तिथे लिहता येतील. प्रभातच्या दर मंगळवारी प्रकाशित होणाऱ्या आरोग्य जागरच्या मागील काही अंकात आलेले दूरध्वनी नंबर तुम्ही कापून तिथे चिटकू शकता, म्हणजे वेळप्रसंगी सगळे नंबर एकत्र सापडू शकतील.
रोजच्या धावपळीच्या जगण्यात शरीराचे काहीतरी दुखत असते. पण, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. नंतर ते विसरूनही जातो. पण, हेच दुखणं नंतर वाढू शकते. त्यापेक्षा ते डायरी ( health benefits of dairy ) लिहून ठेवले तर डॉक्टरांना दाखवता येईल व योग्य औषधोपचार घेण्यास मदत मिळेल.