health awareness मधुमेहाच्या रुग्णाचा आहार कसा असावा ?
March 9th, 8:23amMarch 8th, 2:26pm
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट असे गोड पदार्थ पूर्णपणे बंद करावे.
फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, शिळे अन्नपदार्थ सेवन करणे पूर्णपणे टाळावे.
तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ बंद करावे. दूध, साय, लोणी, नारळ, अंडी, पामतेल, शुद्ध तूपही यांमुळे हृदय रोगालाही आमंत्रण मिळते.
मोनो अनसॅचुरेटेड नावाची चरबी शेंगदाणा, मोहरी, तीळ यांपासून बनलेल्या तेलात आणि फिश ऑइल यामध्ये जास्त असते. यांचे सेवन फायदेशीर असते. जवस, अक्रोड, बदाम, मासे, बीन्सही फायदेशीर
ट्रान्सफॅटी ऍसिड्स घातक असतात. वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी यात हे प्रमाण जास्त असते.
मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे बंद करावे.
आंबा, केळी, चिक्कू, द्राक्षं ही फळे बंद करावीत.
पालेभाज्या, कोबी, गवार, दोडके, कारले, शेवगा या भाज्या खाव्यात.
मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे जास्त खावे.
टरबूज, पपई, बोर, पेरू, जांभळे, सफरचंद, करवंदे इत्यादी फळे घ्यावीत. रोज एक फळ खाणे रोग्यासाठी चांगले असते.
तंतुमय पदार्थांचे सेवन करावे जसे रागी, बाजारी, मका, गहू इत्यादी.
द्रव पदार्थ उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी घ्यावेत.
मधुमेहाच्या रुग्णाने उपवास टाळावेत. रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धवस्था येण्याची शक्यता असते. प्रवास करतानाही जेवणाच्या वेळा पाळाव्यात.