Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

health awareness तुमची मान अवघडल्यास काय कराल ? – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 8, 2022
in आरोग्य वार्ता
A A
health awareness तुमची मान अवघडल्यास काय कराल ? – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आडवे तिडवे झोपल्यामुळे, हात दाबून झोपल्यामुळे, सोफ्यावर मागे मान टेकून झोपल्याने, खूप जास्त वेळ फोनवर बोलणे किंवा उंच उशी घेऊन झोपल्यामुळे मान आणि खांदे यांमध्ये वेदना होऊ लागतात. अनेकदा स्नायू किंवा नसांवर दबाव येतो. त्यामुळेही मान दुखते.

फोनवर बोलताना इअरफोन लावा
खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून बोलण्यापेक्षा हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरावेत. त्यामुळे मोबाइलच्या रेडिएशनमुळे बचाव होईल.

वाकून काम करू नका
ऑफिसमध्ये काम करताना कॉम्प्युटरवर काम करत असाल तर शरीर झुकवून काम करू नये. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनची उंची डोळ्याच्या उंचीइतकी ठेवावी. शरीर आणि मान खालच्या बाजूला वाकू नये. वाकून काम केल्याने मानेच्या वेदना होतातच, पण भविष्यात मणक्‍याच्या हाडांशी निगडित समस्या निर्माण होतात.

उंच उशीचा वापर नको
झोपताना उंच उशीचा वापर करीत असाल तर मानदुखी होऊ शकते. वेदना होत असल्यास झोपताना उशी घेऊ नये. उशी वापरायची असेल तर विशेष स्वरूपाच्या सर्व्हायकल उशांचा वापर करावा. ही उशी देखील अतिउंच नसावी किंवा अतिपातळ पण नसावी. या उशीचा वापर करून मानेला आराम मिळाला पाहिजे.

योग्य पद्धतीने बसा
खुर्ची आणि सोफ्यावर आडवे तिडवे बसू नका. त्यामुळे मानेच्या समस्या होतात. खुर्ची किंवा सोफ्यावर बसताना योग्य पद्धतीने बसावे. शक्‍यतो कायम ताठ बसावे तसेच खुर्चीवर एकाच पद्धतीने बराच काळ बसू नये. मानेच्या स्नायूंना आराम मिळावा यासाठी अधूनमधून थोडा वेळ आराम करावा, मानेचे व्यायाम करावेत.

मान दुखू लागल्यास बर्फाने शेकावे
मानदुखीमध्ये बर्फाने शेकल्यास लवकर आराम पडतो. त्यासाठी बर्फाचे तुकडे कापडात बांधून वेदना होणाऱ्या जागी शेकावे. त्यामुळे सूज कमी होते. जमल्यास कॉलरचा वापर करावा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar