Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हॉटेलमध्ये जेवण करून तुमचंही ‘वजन’ वाढलंय का?

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हॉटेलमध्ये भोजन घेताना आपण आरोग्याचे निकष विसरून चालणार नाही…

घरातून निघताना थोडे खाऊन निघायचे
बाहेर खायला जायचे असेल तेव्हा घरातून निघण्यापूर्वी काहीतरी खाऊन निघायचे. उदा. एखादे ताजे फळ अथवा सुकामेवा, ताक वाफवलेली कडधान्ये इ. कारण आपण कडकडीत भूक लागली असताना हॉटेलमध्ये गेलो तर नको ते आणि नको तितके मागवले जाते. हॉटेलमधील वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे वास आपली भूक अजूनच वाढवतात आणि गरज नसताना आपण जास्तीचे खातो. घरून थोडे खाऊन गेल्यास हे टाळता येईल.

हॉटेलमध्ये शांत ठिकाणी बसायचे
खिडकीजवळ किंवा टी.व्ही. जवळची जागा नको: बऱ्याचदा खाताना समोर टीव्ही चालू असेल, खिडकीतून बाहेरचे दृश्‍य दिसत असेल तर खाण्याकडे आपले लक्ष रहात नाही. आपल्या नकळत आपण जास्तीचे खातो, नीट न चावता पोटात ढकलतो. हे टाळायचे.
ऑर्डर देण्याआधी मेनूबद्दल माहिती करून घ्या

गरज पडल्यास मेन्युमध्ये बदल सुचवायचे: यासाठी हॉटेलचा मेनू ऑनलाईनही बघता येईल किंवा तिथे जाऊन चौकशी करता येईल. शक्‍यतो तळलेले पदार्थ, गोड पदार्थ घेणे टाळायचे. ग्रिल केलेले, वाफवलेले, परतलेले, भाजलेले पदार्थ निवडायचे. एखादा पदार्थ निवडला तर त्यातील घटकपदार्थ काय आहेत? तो पदार्थ तयार करायची पद्धत कशी आहे? पदार्थ किती प्रमाणात सर्व्ह केला जातो (एक डिश किती जणंना पुरते), त्या पदार्थाबरोबर साईड डिश काय येते (सॉस, चिप्स, ब्रेड, करी/ रस्सा इ.), त्या पदार्थाच्या रेसिपीत काही बदल करता येतील का? उदा. मीठ कमी, साखर नको, बटर नको, सॉस वेगळा देणे, तळण्याऐवजी तव्यावर परतून / बेक करून देणे इ. उदा. फिंगर चिप्स ऐवजी बेक्‍ड पोटॅटो, ड्रेसिंगशिवाय सॅलड, क्रीमशिवाय सूप, बटर रोटी ऐवजी व्हीट (तंदूर) रोटी इ.

छोटी प्लेट निवडायची
असे लक्षात आले आहे की जेवढी मोठी प्लेट तितके खाण्याचे प्रमाण जास्त! त्यामुळे छोटी प्लेट मागवायची. त्यात थोडे जरी वाढले तरी प्लेट भरलेली दिसते. छोटी प्लेट नसेल तर मोठ्या प्लेटचा निम्मा भाग सॅलडने भरला जाईल याची काळजी घ्यायची!

बुफे टाळायचे
बुफे म्हटला की आपण हवे तितके हवे तितक्‍या वेळा जाऊन खातो! त्यापेक्षा जिथे मर्यादित प्रमाणात सर्व्ह केले जाते असा पर्याय निवडायचा.

स्टार्टर्स पासून सावधान
हॉटेलमध्ये गेलं की मेन कोर्स येईपर्यंत आपला वेळ जात नाही. मग मसाला पापड, फिंगर चिप्स, मंचुरियन, चिकन लॉलीपॉप, क्रिस्पी कॉर्न यासारखे तळलेले पदार्थ स्टार्टर म्हणून मागवले जातात. यातून प्रचंड प्रमाणात कॅलरीज आणि फ्टॅस पोटात जातात. स्टार्टर्सनंतर मेन कोर्स खाल्ला जातो! मेन कोर्सनंतर स्वीट डीश!! हा होतो वजन वाढण्याचा परफेक्‍ट फॉर्म्युला! त्यामुळे स्टार्टर शक्‍यतो मागवायचेच नाहीत; मागवले तर सॅलड, सूप, भाजलेला पापड असे स्टार्टर्स मागवता येतील.

जेवणाबरोबर शीतपेये / ज्यूस नको
हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याचदा जेवणाबरोबर पाण्याऐवजी शीतपेये, सोडा अथवा फ्रूट ज्यूसेस मागवले जातात. यातून अतिरिक्‍त कॅलरीज, साखर आणि सोडियम पोटात जाते. त्यामुळे जेवणाबरोबर साधे पाणी मागवणे केव्हाही चांगले. साध्या पाण्याऐवजी लिंबूपाणी, मसाला ताक, सोलकढी असे पर्याय निवडता येतील.

जेवणानंतर स्वीट डिश नको
भरपेट जेवण झाल्यानंतर वर अजून स्वीट डीश घेणे म्हणजे वजनवाढीसाठीचे आणि रक्तातली साखर वाढण्यासाठीचे कारण. एकतर स्वीट डिश मागवायचीच नाही, मागवायची असल्यास फ्रूट प्लेट सारखी हलकी आणि आरोग्यदायी स्वीट डिश मागवायची किंवा स्टार्टरनंतर मेन कोर्स न घेता थेट स्वीट डिशच घ्यायची!

सावकाश, व्यवस्थित चावून खायचे
लक्ष देऊन प्रत्येक घास नीट चावून खायचा म्हणजे पोट भरल्याची भावना लवकर होते आणि अतिरिक्त खाल्ले जात नाही.

संपवायचे म्हणून खायचे नाही
हॉटेल्समध्ये बऱ्याचदा गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात पदार्थ सर्व्ह केले जातात. त्यामुळे सुरुवातीला मागवतानाच मोजके मागवायचे. पोट भरल्यानंतर एखादा पदार्थ शिल्लक राहिला तर वाया जाऊ नये म्हणून संपवायचा नाही; त्यापेक्षा पार्सल करून घ्यायचा. तो कोणाला देता येईल किंवा नंतरही खाता येईल.

 

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarrajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar