पुणे – येथे आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत तो केल्यामुळे केवळ 10 दिवसांत पोटाची चरबी वितळेल, ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल, तेही नैसर्गिक पद्धतीने. कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा कोणतेही केमिकलयुक्त औषध न घेता. यासाठी तुम्हाला एक चूर्ण खावे लागेल. हे चूर्ण तुम्ही घरी बनवू शकता, ते ही अगदी कमी खर्चामध्ये. यासाठी तुम्हाला तीनच पदार्थ गरजेचे आहेत, जे तुम्हाला घरामध्येच सहज उपलब्ध होतील.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तीन औषधी जवस किंवा अळसी : हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कारण यामध्ये ओमेगा-3 फैटी ऍसिड आणि फाइबर भरपूर प्रमाणात असते. याच्या वापरासाठी जवस गरम करावी.
जिरा : सुकलेला जिरा घ्यावा. जर तुम्हाला वाटले की हे थोडे ओलसर आहे तर तुम्ही त्यास ऊनात सुकवू शकता. जिरा मेटाबॉलिज्म बुस्ट करते आणि इम्यून सिस्टम मजबूत करते. वजन कमी करते.
ओवा किंवा अजवाइन : ओवा हा पोटासाठी फायदेशीर असतो. हे चरबी कमी करण्यासाठी मदत करते.
कृती : हे चूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला 3 चमचे जवस, 2 चमचे जिरा, 2 चमचे ओवा घ्यावे लागेल. जवसचे बीज, ओवा आणि जिरा या वस्तू व्यवस्थित सुकलेल्या असाव्यात. आता यांची बारीक पावडर करून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण पोटाची चरबी वेगाने विरघळवते.
सेवन करण्याची पद्धत : हे चूर्ण घेताना लक्षात ठेवायचे आहे की तुम्हाला जेवण जेवण्याच्या आधी आणि नंतर कोमट पाणीच प्यायचे आहे. याच सोबत संपूर्ण दिवस पुरेसे पाणी प्यावे. एक चमचा चूर्ण कोमट पाण्याच्या सोबत दररोज नाश्ता करण्याच्या अगोदर घ्यायचे आहे. दररोजच्या वापरामुळे पोटाची चरबी 10 दिवसांत कमी झाल्याचे दिसून येईल.
जर अधिक जास्त वेगाने परिणाम पाहिजे असेल तर हा उपाय दिवसातून दोन वेळा करू शकता. एक चमचा सकाळी नाश्ता करण्याच्या अगोदर आणि एक चमचा रात्री जेवण जेवण्याच्या अगोदर असे घेऊ शकता. चूर्ण घेताना या गोष्टीकडे लक्ष ठेवा की तुम्हाला यादरम्यान थंड प्रवृत्ती असलेल्या वस्तू खाव्या लागतील कारण जवस ही प्रवृत्तीने गरम असते.
वजन कमी करण्यासाठी अन्य उपाय –
योग आणि एक्सरसाइज : जवळपास 10-20 मिनिटं कार्डीयो एक्सरसाइज करा, यामुळे वजन लवकर कमी होते, जर तुम्ही क्रंच नाही करू शकत असाल तर हे व्यायाम करा ज्यामुळे फॅट बर्न होईल. विंडमिल, टर्किश सिटअप्स, रस्सीवरच्या उड्या आणि सोबतच योग करावा.
कॅलरीवाल्या वस्तू खाऊ नये : वजन कमी करायचे असेल तर हाय कॅलरी असलेल्या वस्तू बिलकुल खाऊ नये. भाज्या आणि फळांचे सेवन करावे. कारण यामध्ये कॅलरी कमी असतात आणि फळांमध्ये केळे आणि चिकू यांचे सेवन करू नये कारण यामध्ये जास्त कॅलरी असतात.
गाजर : गाजर शरीरात चरबी वाढवण्यास विरोध करते आणि पोटाची चरबी कमी करते. रोज जेवणा अगोदर 1 किंवा 2 गाजर खावे यामुळे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही आणि तुम्ही कमी जेवण जेवाल. ज्यामुळे शरीराला कमी कॅलरी मिळतील आणि तुमचे वजन कमी होईल.
जंक फूड खाऊ नये : जंक फूड, शुगर उत्पादने आणि तळलेले पदार्थ कमीतकमी खावे. यामुळे वजन वेगाने वाढते आणि सोबतच इतर आजार होतात.
दही : रोज जेवणासोबत दही खावे. रोज दही खाण्यामुळे पोटाची चरबी वितळून निघून जाते आणि रोज पुदिना असलेला चहा प्यावा यामुळे बाहेर आलेले पोट आतमध्ये जाते.
फॅट बर्नर म्हणजे काय?
फॅट बर्नर म्हणजेच चरबी कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे
शरीराचा उष्मांक वाढतो, पचन कमी केले जाते, व्यायामाशिवाय वजन कमी होते, वाढते असे दावे, अशा गोळ्या बनविणाऱ्या कंपन्या करत असतात.
त्यांच्या मते, फॅट बर्नर्स हे आजच्या समाजामध्ये फारच लोकप्रिय होत आहेत. आजच्या तरुण पिढीतच नव्हे तर मध्यमवयीन व्यक्तींमध्येही फॅट बर्नर्सच्या गोळ्या घेऊन त्यांच्या जाहिरातींमधील युवक-युवतींप्रमाणे शारीरिक कष्टांशिवाय स्लीम दिसण्याची तीव्र इच्छा दिसून येत आहे. दहा दिवसांमध्ये तीन पौंड वजन घटविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांना अशा मार्गाने वजन घटविण्याने, चामडी बरोबरच आपल्या पचनशक्तीवर, स्नायूंच्या क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होणार आहे, याची यत्किंचितही जाणीव दिसत नाही.
अशा फॅट बर्नर गोळ्या घेतल्याने खरोखरीच चरबी कमी होते? दोन अडीच हजारांची ही औषधे ग्राहकाला खरंच समाधान देतात? भारतात नसेल कदाचित, पण युरोपमधील शास्त्रज्ञ या विषयावर संशोधन करत आहेत. फॅट बर्नर म्हणजे चरबी कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे शरीराचा उष्मांक वाढतो. पचन कमी केले जाते. व्यायामाशिवाय वजन कमी होते. क्रयशक्ती वाढते असे दावे, अशा गोळ्या बनविणाऱ्या कंपन्या करत असतात. हे दावे कितपत खरे आहेत, हे आता पाहू.