Happy New Year 2024: लवकरच वर्ष 2023 संपणार असून 2024 वर्ष सुरु होणार आहे. अवघे काही तास बाकी राहिले आहेत. नववर्षानिमित्त अनेक लोक नवीन संकल्प करत असतात. तसेच इतरांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देत असतात. नववर्षानिमित्त लोकांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुम्ही नववर्षाच्या निमित्ताने जवळच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना ऑनलाइन मेसेज पाठवून आनंद साजरा करा.
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले 2024 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना!
31 तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात
भरपूर काम करा…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख-दुःखं झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात
याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गेल्या त्या आठवणी, गेल्या त्या संधी..
ह्या नवीन वर्ष करुया मेहनत आजुन थोडी..
मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी..
ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही..
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2024 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं…
पण या नव्या वर्षात तुम्हाला
सर्व काही मिळो जे
तुम्हाला मनापासून हवं आहे.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
नववर्षाची सकाळ होताच तुमचं
आयुष्यही व्हावं प्रकाशमय
ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
जगातील प्रत्येक आनंद
प्रत्येक पावलावर तुला मिळो,
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
हे आपल नातं असंच राहू दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2023 या वर्षाचा
2024 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत,
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर.
सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर,
तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर
आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जे गेलं ते वर्ष विसरून जा,
नव्या वर्षाला आपलंस करा.
देवाकडे करतो हीच प्रार्थना,
या नव्या वर्षात होवो सर्व स्वप्नांची पूर्ती तुमच्या.
कुटुंब हे सर्वात मोठं गिफ्ट आहे,
जे सगळ्यांना मिळालं आहे.
हे नवं वर्ष तुमच्यासाठी कुटुंबासोबत
अजून चांगल्या आठवणी देणारं जावं.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
नव्या वर्षात वाईट सवयी अंगातून झटकून
चांगल्या सवयी अंगी लावुया..
हाच ध्यास घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करुया!!
एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी
आपण फक्त करणंच नाहीतर..
त्याचं स्वप्नंही पाहिलं पाहिजे.
नव्या वर्षात नव्या संधी मिळवा.
आणि जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्या.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात
या वर्षात उजळून जाऊ दे भाग्याची ही रेषा
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास
तुमच्या उपस्थितीने लखलखू दे हे जीवन आज
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
The post Happy New Year 2024: आपल्या मित्र-नातेवाईकांना नवीन वर्षांच्या पाठवा खास शुभेच्छा; 20 शुभेच्छा संदेश appeared first on Dainik Prabhat.