Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Hair Care: दररोज केस धुणं फायद्याचं की नुकसानकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत व योग्य पद्धत

by
August 2, 2025
in लाईफस्टाईल
A A
Hair Care: दररोज केस धुणं फायद्याचं की नुकसानकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत व योग्य पद्धत
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Hair Care: बहुतेक लोकांचा असा समज असतो की रोज केस धुतल्याने केस अधिक स्वच्छ,मऊ आणि आरोग्यदायी राहतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा असतो. आणि केस धुण्याची गरजही त्यानुसार ठरते. म्हणूनच ‘रोज केस धुणं आवश्यक आहे का?’ याचं उत्तर सर्वांसाठी सारखं नसतं.

आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांनी आठवड्यातून २ वेळा केस धुवावेत. ज्यांचे केस सामान्य आहेत त्यांनी आठवड्यातून २-३ वेळा केस धुवावेत. आणि ज्यांचे केस तेलकट किंवा लवकर चिकट होतात त्यांनी आठवड्यातून किमान ३-४ वेळा केस धुवावेत.
तुमच्या केसांची रचना, स्कॅल्प टाइप कशी आहे म्हणजे कोरडी, नॉर्मल की तेलकट या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन केस धुवावेत.

रोज केस धुतल्याने काय घडते

रोज केस धुतल्याने घाम, धूळ आणि प्रदूषण यापासून बचाव होतो. आणि टाळूवरचे मृत पेशी व कोंडा दूर होण्यास देखील मदत होते.
रोज केस धुण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. रोज केस धुण्याने केसांचं नैसर्गिक तेल निघून जातं,ज्यामुळे कोरडेपणा वाढतो.केस गळणे, दोरखे फुटणे यासारख्या समस्या देखील वाढतात.

केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

1. केस धुण्याआधी सौम्य तेल किमान ३० मिनिटं आधी लावावे.
2. केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरा. जास्त थंड किंवा फार गरम पाणी टाळा.
3. सौम्य आणि सल्फेट-फ्री शँपू वापरा.
4. शँपू थेट स्कॅल्पवर लावण्याऐवजी आधी पाण्यात विरघळवा.
5. शाम्पूने फक्त स्कॅल्प मालीश करा, केसांच्या टोकांना शँपू लावू नका
6. कंडिशनर फक्त केसांच्या टोकांवर वापरा, टाळूवर नको
7. केस धुतल्यावर टॉवेलने रगडू नका हलकं दाबून पाणी शोषून घ्या.
8. नेहमी केस नैसर्गिकरित्या वाळू द्या. ड्रायरचा वापर मर्यादित ठेवा

केस धुण्याची योग्य वेळ कोणती?

शक्यतो केस सकाळी लवकर धुवावेत. कारण रात्री शरीर आणि स्कॅल्प नैसर्गिक तेल निर्माण करतात. कामानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर, विशेषतः प्रदूषणात वेळ घालवला असेल तर केस धुणं केव्हाही चांगलं असत.

तज्ञ् काय सल्ला देतात?

केसांचं आरोग्य टिकवण्यासाठी नैसर्गिक तेलांचं संतुलन राखणं महत्त्वाचं असत. केस कोरडे वाटत असतील तर शँपू करण्याआधी केसांना तेल लावा. आणि नंतर कंडिशनरचा वापर करा. वेगवेगळ्या हंगामात केसांची गरज वेगळी असते. हिवाळ्यात केस थोडं कमी धुणं फायद्याचं ठरू शकतं.

शेवटचं सांगायचं झालं तर…रोज केस धुणं आवश्यक नाही. गरजेनुसार,योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रॉडक्ट्स वापरून केस धुणं हेच आरोग्यदायी केसांचं रहस्य आहे.

Join our WhatsApp Channel

The post Hair Care: दररोज केस धुणं फायद्याचं की नुकसानकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत व योग्य पद्धत appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar