Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Guava: पेरू खा किंवा त्याची पानं चावा; कोलेस्ट्रॉल आणि तोंडाच्या अल्सरमध्ये मिळेल आराम

by
January 5, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Guava : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात योग्य बदल करणं खूप गरजेचं आहे. रोजच्या आहारात हंगामी फळांचा समावेश केल्यास आरोग्याला मोठा फायदा होतो. चविष्ट आणि पौष्टिक असलेले पेरू हे फळ आरोग्यासाठी विशेष उपयुक्त मानलं जातं. मात्र, जितकं फळ फायदेशीर आहे, तितकीच त्याची पानंही औषधी गुणांनी भरलेली असतात, हे अनेकांना माहिती नसतं.

पेरूच्या पानांचा वापर अनेक वर्षांपासून घरगुती उपायांमध्ये केला जातो. अभ्यासानुसार पेरू आणि त्याची पानं डायरिया, रक्तदाब आणि पचनाच्या समस्यांमध्ये लाभदायक ठरतात. पारंपरिक उपचारांमध्ये पेरूच्या पानांचा चहा देखील उपयोगी मानला जातो.

तज्ज्ञांच्या मते, पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन C, क्वेर्सेटिन आणि फ्लेव्होनॉईड्स हे प्रभावी घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय पचनसंस्था आणि दातांच्या आरोग्यासाठीही ही पानं फायदेशीर ठरतात.

पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

तोंडाच्या अल्सरवर आराम

पेरूच्या पानांमध्ये असलेले फ्लेव्होनॉईड्स हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहेत. तोंडात होणाऱ्या फोडांवर (अल्सर) पेरूची पानं चावणं किंवा ती पाण्यात उकळून त्याने गुळण्या करणं फायदेशीर ठरतं. यामुळे वेदना कमी होतात आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

पेरूच्या पानांचा चहा नियमित पिल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते, असं संशोधनात आढळून आलं आहे. आठ आठवड्यांनंतर ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ (LDL) मध्ये घट दिसून आली. बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यामुळे पेरूची पानं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक

केस गळणं आणि केस कमकुवत होण्याच्या समस्यांवर पेरूची पानं उपयुक्त ठरतात. पेरूची पानं उकळून त्या पाण्याने टाळूची मालिश केल्यास केसांच्या मुळांना बळकटी मिळते. अँटीऑक्सिडंट्समुळे केस मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.

पचनासाठी फायदेशीर

पेरूच्या पानांचा वापर पचनसंस्थेसाठीही उपयुक्त आहे. विशेषतः अतिसार (डायरिया) झाल्यास पेरूच्या पानांच्या अर्काचा फायदा होतो. या अर्कामध्ये असलेले घटक जुलाबासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंची वाढ रोखतात. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि सूज यांसारख्या तक्रारींवरही आराम मिळतो.

Join our WhatsApp Channel

The post Guava: पेरू खा किंवा त्याची पानं चावा; कोलेस्ट्रॉल आणि तोंडाच्या अल्सरमध्ये मिळेल आराम appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar