हे बैठक स्थितीतील आसन आहे. हे आसन दोन स्थितींमध्ये केले जाते. पहिल्यांदा जमिनीवर दोन्ही पाय पसरुन बसावे. लांब मांडी घालावी, दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून घ्यावे आणि हातांच्या तळव्यांनी पाऊले पकडावी. कमरेत ताठ बसावे व आसन करताना भरपूर श्वास घ्यावा आणि आसन पूर्ण होताच कुंभक करावे. लक्ष स्वादिष्ठान चक्रावर केंद्रीत करावे. गुदद्वार आणि लिंग (पुरुषांमध्ये) आणि स्त्रियांमध्ये योनीपाशी दोन्ही पायांची पावले जुळवून चिकटवावी. जांघा जमिनीला टेकलेल्या पाहिजे. दृष्टी स्थिर करावी. स्त्रियांनी हे आसन करताना एक काळजी घ्यावी ती अशी की आपल्या जननेंद्रीयावर कोणत्याही प्रकारचा भार पडू देऊ नये. तसेच पुरुषांचा अंडकोश दबला जाऊ नये. आसनस्थिती दहा मिनिटे टिकवता येते. ( Gorakhshasana )
गोरक्षासनाच्या दुसऱ्या स्थितीत पोटऱ्या या जांघेखाली टेकवाव्यात दोन्ही हात गुडघ्या लगत ठेवून ध्यान मुद्रेत बसावे. श्वास घ्यावे गुडघे शक्यतो जमिनीला टेकलेले हवेत. आसन स्थिती पूर्ण होताच श्वास रोखावा. आपले लक्ष हे स्वादिष्ठान चक्रावरच असतेच पण आसनस्थिती सोडताना श्वास हळूहळू सोडून शरीर सैल करावे. पाय सरळ समोर घ्यावेत, हात मागे टेकून रिलॅक्समध्ये बसावे.
गोरक्षासनाचे अनेक फायदे आहेत. शुक्रग्रंथीमधील दोष दूर होऊन त्यांना व्यायाम होतो. वीर्य रक्षण होते. स्त्रियांचे प्रमेह आदी रोग दूर होतात. स्वप्नदोषाचा विकार पूर्णपणे बरा होतो. तसेच स्त्रियांचा गर्भाशय बळकट होतो. सेक्सुअल प्रॉब्लेम्स दूर होतात. गुडघा आणि जांघेतील शीरा आणि पेशींचे कार्य सुधारते. त्या बळकट होतात. मासिक पाळीमध्ये जर अनियमितता असेल तर ती दूर होण्यास गोरक्षासन मदत करते म्हणून स्त्रियांनी रोज हे आसन करावे. ( Gorakhshasana )
जे टिकवायला सोपे आहे. आसन करताना कंबरेत वाकू नये, ताठ बसावे, दृष्टी समोर ठेवून चेहराही सरळ ठेवावा. मूत्र विकार दूर करणारे गोरक्षासन हातापायातील शुद्ध रक्ताचा पुरवठा नियमित तर करतेच पण हात-पायही मजबूत करते. ल्युकोरिया तसेच कंबरदुखी असे रोग गोरक्षासनाच्या नियमित अभ्यासाने दूर होतात. तेव्हा गर्भाशयाच्या बळकटीसाठी तसेच शुक्रासनाच्या पुष्टतेसाठी गोरक्षासन स्री आणि पुरुष दोघांनी करावे. गोरक्षासन पुरुषांना ब्रह्मचर्य व्रत पालनात मदत करते. तसेच आत्मबळ, आत्मचेतना तर वाढवतेच पण एकंदर शरीरातील शक्तीही वाढते. ( Gorakhshasana )