मधुमेह आहे की नाही यासाठी केली जाणारी ही परीक्षा शक्यतो 80 ग्रॅम ग्लुकोज 100-150 मिली पाण्यात विरघळवून ते व्यक्तीस दिले जाते. ही चाचणी उपाशीपोटी करावयाची आहे. सामान्य व्यक्तीमध्ये ग्लुकोज पिण्यात आल्यानंतर रक्तातील साखर त्वरित वाढते. रक्तरसातील ग्लुकोज पातळी 11.1 मिलिमीलर/लि किंवा 200मिग्रॅ /100 मिली दोन तासांनी असल्यास व्यक्तीस मधुमेह आहे असे निदान केले जाते. अचूक निदान होण्यासाठी दर अर्ध्या तासांनी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरून आलेख काढला जातो.
ग्लुकोज द्रावण घेतल्यापासून तीन तासांच्या रक्तातील ग्लुकोज पातळीवरून रक्तातील ग्लुकोज पातळी कशी बदलते हे समजते. ही मधुमेहाचे निदान करण्याची विश्वासार्ह चाचणी आहे. घरी रक्तातील ग्लुकोजची चाचणी करणारी उपकरणे उपलब्ध झाल्यापासून रुग्णाना स्वतःच्या रक्तातील ग्लुकोजची पाहणी करणे सोपे झाले आहे. रक्त बोटाच्या टोकामधून काढण्यात येते. रक्त तपासण्यासाठी एक लहान सुई असलेले उपकरण, रक्त तपासण्यासाठी कागदी पट्ट्या आणि हे मोजण्यासाठी बॅटरीवर चालणारे डिजिटल उपकरण यावर रक्तातील ग्लुकोजची पातळी दररोज किंवा आवश्यकतेनुसार मोजता येते. नवीन मधुमेह रुग्ण आणि इन्शुलिन घेणारे रुग्ण यांच्यासाठी हे उपकरण आवश्यक आहे. आपला मधुमेह आटोक्यात आहे की नाही यासाठी एचबी ए1सी- ग्लायकॉसिलेटेड हिमोग्लोबिन नावाची एक चाचणी दर सहा महिन्यांनी करावी. मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्त परीक्षणाची एचबीए1सी पातळी 6.4 असते. मधुमेह झालेल्या व्यक्तीने त्याच्या एचबीए1सीची पातळी शक्यतो 6.5 पर्यंत राखण्याचा प्रयत्न करावा असे मधुमेहतज्ज्ञ सांगतात. या चाचणीसाठी दिवसभरात केंव्हाही रक्त दिले तरी चालते.
आहार व्यवस्थापन : मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहारवर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्यासोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच मधुमेहींना माहिती पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. मधुमेहींना आणि सर्वसामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही; पण हे माहीत नसते की खारट आणि आंबटदेखील जास्त चालत नाही. त्यांनी तुरट, कडू आणि तिखट पदार्थ जास्त खावेत.
* मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्यासोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.
लवकर पचणारी फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे, जी लवकर पचतात आणि आतड्यांना साफ ठेवण्यास मदत करतात.
* मधुमेह आहार नियंत्रण ठेवण्याचे पदार्थ मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिकू, सीताफळ इत्यादी खाऊ नये.
* मधुमेह झाल्यास तरल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी. यामुळे देखील मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल.
* डॉक्टर कडून सल्ला घेऊन मधुमेह रोगी पौष्टिक आहारासाठी एक मधुमेह आहार तक्ता बनवून घेऊ शकतात.