आयुर्वेदिय दुकानात दगडी पाषाणभेद म्हणजे एक मातीच्या रंगाचे औषध ( medicinal plants information in marathi ) मिळते. ते मुरमाच्या तांबड्या दगडात सापडते. हे दगड फोडल्यावर त्यात मिळते, म्हणून त्यास पाषाणभेद म्हणतात. याची चव हुबेहुब मातीसारखी लागते.
हे खाल्ल्यानंतर काही वेळाने जीभ खवखवते, थोडी चुणचुणते. ह्यालाच सातपुड्यातील भिल्ल शिलाजीत असे म्हणतात.
कफावर अत्यंत उपयुक्त
हा दगडी पाषाणभेद किंवा शिलाजीत कफावर अत्यंत गुणकारीऔषध आहे.यासाठी प्रथम दगडीपाषाणभेदाची शुद्धी केली जाते
दगडी पाषाणभेदाची शुद्धी
शिलाजीत बाजारातून आणून एका फडक्यात बांधून तो दुधात शिजवावा. दुधात शिजविण्याची रीत अशी एक चांगले मडके घेऊन त्याच्या तोंडावर राहील एवढी बेताची काटकी घ्यावी. त्या काटकीला दगडी पाषाणभेद बांधलेले फडके बांधावे; आणि मडक्यात घातलेला पाषाणभेद बुडेल इतके दूध घालावे. दगडी पाषाणभेद बांधलेले फडके मडक्याच्या तळाशी टेकू देऊ नये.
मडक्याच्या खाली मंद आच द्यावी. 3 तास दुधात शिजविलेला पाषाणभेद बाहेर काढून सुकवावा म्हणजे तो औषध ( medicinal plants information in marathi ) स वापरण्यात तयार झाला असे समजावे. असा शुद्ध केलेला दगडी पाषाणभेद बारीक घोटून वस्त्रगाळ करून दुधातून द्यावा. हे वस्त्रगाळ केलेले चूर्ण दोन बोटाच्या चिमट्या म्हणजेच 1/2 ग्रॅम, 10 मि. लि. दुधात पाषाण भेदाइतकी साखर घालून कफ झालेल्या माणसास द्यावे; कफ कमी होतो असा अनुभव आहे.
तोंडास रूची येण्यासाठी
खूप कफ झाला आहे, सारखे कफाचे पिवळट, खारट बेडके पडत आहेत, तोंडास रूची नाही, अशा वेळी दगडी पाषाण भेद दिवसातून चार वेळ दिला असता एका सप्तकात कफ कमी होतो; असे सांगतात. सटाणा, चाळीसगाव यामधील डोंगरात असलेल्या भिल्लांचे हे कफाचे औषध आहे.
भूक लागण्यासाठी व ताप कमी होण्यासाठी
रोज ताप येत आहे, खोकून खोकून फार त्रास झाला आहे, भूक लागत नाही, खाणे जात नाही, अशा रोग्यास त्यांनी दगडी पाषाणभेद दर वेळेस 1 ग्रॅम, 20 मि. लि. दूध आणि 3 ग्रॅम खडीसाखर यातून दिवसातून चार वेळा दिला, याने रोग्यास दोन सप्तकात आराम वाटला असे ते म्हणतात.
क्षय रोगावर
क्षय रोग्याच्या कफात हे रामबाण औषध आहे व ते दूध आणि खडीसाखरेतून द्यावे. दगडी पाषाणभेद याची इंग्रजी तऱ्हेने परीक्षा करिता हे जवळजवळ चुन्यासारखे म्हणजेच कॅल्शियम परीक्षेत ठरले व चुना हे कफावर एक चांगले औषध ( medicinal plants information in marathi ) आहे म्हणून कफावर हे उत्तम लागू पडेल यात शंका नाही. हे वापरून पाहता प्रतिःशाय म्हणजे हरारत पडसे यात हे चांगले लागू पडेल यात शंका नाही. हे वापरून पाहता प्रतिःशाय म्हणजे हरारत पडसे यात हे चांगले लागू पडले असे दिसून आले.
सर्दी खोकल्यावर उपयुक्त
हवा फिरली, पाणी बदलले, वारा लागला इत्यादीमुळे थोडी सर्दी झाली, अंग जड झाले, किंचित खोकला झाला, थोडा ताप वाढला, अशावेळी हे दगडी पाषाणभेद चिमूटभर, कडकडीत दूध आणि खडीसाखरेमध्ये घेतले असता बरे वाटून फार फायदा होतो असे दिसून आले. हवा फिरली, पाणी बदलले, वारा लागला इत्यादीमुळे थोडी सर्दी झाली, अंग जड झाले, किंचित् खोकला झाला, थोडा ताप वाढला, अशावेळी हे दगडी पाषाणभेद चिमूटभर, कडकडीत दूध आणि खडीसाखरेमध्ये घेतले असता बरे वाटून फार फायदा होतो असे दिसून आले. याने परसाकडे साफ होते, भूक कडकडीत लागते व हुशारी येते असा अनुभव आहे.