Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुमच्या मुलांना ‘या’ वाईट सवयी आहेत का ? तर आताच व्हा सावध

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2021
in लाईफस्टाईल
A A
तुमच्या मुलांना ‘या’ वाईट सवयी आहेत का ? तर आताच व्हा सावध
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नखे कापणे
वेळोवेळी नखे कापणे हे मुख्यतः पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. वाढलेल्या नखांच्या खोबणीत मळ, जंतांची अंडी, माती, इत्यादी पदार्थ साठतात. यातून स्वतःला व इतरांना संसर्ग होत राहतो. दर 2-3 आठवड्यांनी हातापायाची नखे काढावीत. लहान मुलांना नखे काढायची सवय लावावी.

दात घासणे
दात घासणे दातांच्या फटीत अन्नकण अडकून व दातांवर अन्नाचा सूक्ष्म थर जमून जंतूंची वाढ होते. त्यामुळे दात लवकर किडतात. जंतूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि हिरड्या सुजतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर खळखळून चूळ भरावी. याचबरोबर दात, हिरड्या चोळून धुणे आवश्‍यक असते. सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात साफ करणे आवश्‍यक आहे. दात घासण्यासाठी फक्त ब्रश किंवा दातवण काडी (चावून धागे मोकळे झालेली) पुरते. टूथपेस्टची उपयुक्तता मर्यादित आहे. पेस्ट नसल्यास नुसता ब्रश पुरतो.

गोड चवीच्या टूथपेस्टपेक्षा कडू, तुरट, तिखट, खारट चवीची मंजने दातावरचे चिकट आवरण सहज काढतात. यासाठी साधी राख किंवा कोळशाची पूडही चालते. दातांच्या फटी साफ करण्यासाठी मात्र ब्रश किंवा दातवण लागते. बाभूळ, कडूनिंब यांच्या काड्या दातवणासाठी सर्रास वापरल्या जातात. ही चांगली पद्धत आहे. मिश्रीने मात्र दातावर किटण चढते. आरोग्याच्या दृष्टीने मिश्रीचा वापर चुकीचा आहे.

ब्रश वापरण्याची पद्धत महत्त्वाची आहे. ब्रश आडवा न चालवता’खाली-वर’ फिरवला पाहिजे म्हणजे फटी स्वच्छ होतील. हिरड्या बोटाने चोळणेही दात घासण्याइतकेच महत्त्वाचे आहे. हिरड्या चोळण्याने तिथला रक्तप्रवाह सुधारतो.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyablood pressurefitnesshealth
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar