Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Gauri avahana and pujan 2025: गौरी आगमनाच्या तयारीला घराघरांत उत्साह; आवाहनाचा मुहूर्त ३१ ऑगस्टपर्यंत

by
August 30, 2025
in लाईफस्टाईल
A A
Gauri avahana and pujan 2025: गौरी आगमनाच्या तयारीला घराघरांत उत्साह; आवाहनाचा मुहूर्त ३१ ऑगस्टपर्यंत
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

 Gauri avahana and pujan 2025: गणरायाच्या आगमनानंतर आता माहेरवाशीण गौरींच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. रविवारी (३१ ऑगस्ट) अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन होणार असून शहरातील बाजारपेठा खरेदीदारांनी फुलून गेल्या आहेत. महिलांच्या खरेदीला विशेष उत्साह दिसत असून तुळशीबाग, रविवार पेठेसह मध्यवर्ती बाजारांत गर्दी उसळली आहे.

पारंपरिक मुखवटे आणि सजावटींची खरेदी जोरात

गौरींसाठी रेखीव मुखवटे, दागदागिने, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मुखवटे : पितळी मुखवट्यांना रंगवून व पॉलिश करून नटवले जात आहे, तर शाडू व फायबरचे मुखवटे १,५०० रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत.

दागदागिने : कुड्या, ठुशी, मोहनमाळ, मंगळसूत्र, नथ, बुगडी, बांगड्या, तसेच कुंदन व टेम्पल ज्वेलरीला मोठी मागणी आहे. किंमती दोनशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.

सजावट साहित्य : तोरण, रोषणाईच्या माळा, कुंदनच्या माळा, आकर्षक चौरंग, झोपाळा, विजेवर चालणारे कारंजे यांचा समावेश आहे.

गौरींसाठी खास डिझायनर साड्याही महिलांकडून खरेदी केल्या जात आहेत. अनेक घरांमध्ये परंपरेनुसार गौरीला नवी साडी परिधान करूनच तिची घडी मोडली जाते.

आवाहन, पूजन आणि विसर्जनाचा मुहूर्त

आवाहन : रविवारी (३१ ऑगस्ट) सकाळपासून सायंकाळी ५:२७ पर्यंत कोणत्याही वेळी करता येईल.

पूजन : सोमवारी (१ सप्टेंबर) ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करावे.

विसर्जन : मंगळवारी (२ सप्टेंबर) मूळ नक्षत्र असल्याने सकाळपासून रात्री ९:५७ पर्यंत विसर्जन करता येईल.

घराघरांत उत्साह

गौरींसाठी खरेदी, सजावट व अलंकारांच्या तयारीमुळे बाजारपेठा गजबजल्या आहेत. महिलांची लगबग, रेखीव सजावट आणि दागिन्यांचा थाट पाहता यंदाचे गौरी आगमन अधिकच उत्साहवर्धक ठरणार आहे.

Join our WhatsApp Channel

The post Gauri avahana and pujan 2025: गौरी आगमनाच्या तयारीला घराघरांत उत्साह; आवाहनाचा मुहूर्त ३१ ऑगस्टपर्यंत appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar