Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या पूजनात विसरू नका हे खास नियम; जाणून घ्या परंपरा आणि शास्त्र काय सांगते

by
August 27, 2025
in लाईफस्टाईल
A A
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या पूजनात विसरू नका हे खास नियम; जाणून घ्या परंपरा आणि शास्त्र काय सांगते
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Ganesh Chaturthi 2025: भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि भाविकांच्या हृदयाशी घट्ट जोडलेला सण आहे. बुद्धीचा देव, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती अशा स्वरूपात गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते. या वर्षी 2025 मध्ये गणेश चतुर्थी बुधवार, 27 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत घराघरांत, मंडपांत आणि मंदिरांत बाप्पाचं पूजन, आरत्या आणि उत्सवाचा जल्लोष रंगणार आहे.

गणेश पूजनाची प्राचीन परंपरा

इतिहास सांगतो की गणेश पूजनाची परंपरा तब्बल साडेतीन हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. भाद्रपद महिन्यात धान्याची कापणी होत असल्याने पृथ्वीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा प्रघात प्राचीन काळापासून आहे. सुरुवातीला नदीकाठी किंवा शेतातील मातीपासून मूर्ती तयार करून पूजन करून लगेच विसर्जन केले जात असे. नंतर मूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवण्याची परंपरा प्रचलित झाली.

गणेश पूजनातील महत्त्वाचे नियम

शास्त्रानुसार गणपती पूजन करताना काही बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते.

मूर्ती ८ ते १० दिवस आधी आणता येते, केवळ आदल्या दिवशीच आणावी अशी अट नाही.

गर्भवती स्त्री घरात असली तरी मूर्ती विसर्जन करता येते.

प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करूनच विसर्जित करावी.

वाहत्या पाण्यात विसर्जन करणे बंधनकारक नाही; तलाव, टाकी किंवा घरी ठेवलेल्या पात्रातही विसर्जन शक्य आहे. मात्र मूर्ती शाडू किंवा मातीची असावी, जेणेकरून ती सहज विरघळेल.

गौरी पूजनाचे महत्त्व

गौरी म्हणजे पार्वती माता आणि काही प्रथेनुसार तिला महालक्ष्मीचे स्वरूपही मानले जाते. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन तर ज्येष्ठा नक्षत्री गौरी पूजन केले जाते.

गौरी मूर्ती तेरड्या, खडे, मुखवटे किंवा मातीच्या स्वरूपात आणल्या जातात.

नैवेद्य दाखवून तो दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा काही घरांत आहे, पण शास्त्र सांगते की नैवेद्य तत्काळ स्वीकारला जातो. त्यामुळे तो लगेच प्रसाद म्हणून ग्रहण करणे योग्य आहे.

घरातील परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा समतोल साधून पूजन केले तर ते अधिक फलदायी ठरते.

आजच्या काळातील अर्थ

आज पर्यावरणपूरक मूर्ती, पाण्याची नासाडी टाळणारे विसर्जन आणि साधेपणातला भव्य उत्सव हे गणेशोत्सवाचं नवं रूप ठरतं आहे. श्रद्धा आणि परंपरा जपत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला, तर बाप्पाचं पूजन अधिक अर्थपूर्ण ठरेल.

Join our WhatsApp Channel

The post Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या पूजनात विसरू नका हे खास नियम; जाणून घ्या परंपरा आणि शास्त्र काय सांगते appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar