Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

fungal infection information in marathi

by प्रभात वृत्तसेवा
August 24, 2021
in आरोग्य वार्ता
A A
fungal infection information in marathi
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

fungal infection information in marathi – पावसाळ्यात हवेत असलेली आर्द्रता, उष्मा आणि ओलसरपणा यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गजन्य जीवांना आणि कीटकांना वाढण्यास वाव मिळतो. कपडे सहज सुकवता येत नाहीत, त्यावर ओलसरपणा आणि घाण आणखी वाढते. जास्त काळ ओले कपडे घातल्याने लोकांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. 

बुरशीजन्य संसर्गाचे अनेक प्रकार आहेत जे पावसाळ्यादरम्यान होऊ शकतात. एथलीस्ट फूट, दाद-खाज, फंगल नेल इन्फेक्शन, फोड इ. व्याधी या काळात उद्भवतात. बहुतेकदा हा संसर्ग व्यक्ती पासून व्यक्ती पर्यंत सहज पसरतो. 

त्यामुळे या संसर्गाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कधीकधी हा संसर्ग पायांच्या त्वचेपासून हातापर्यंत किंवा शरीराच्या इतर भागातही पसरू शकतो. त्याच वेळी, हे इन्फेक्शन खाजगी भागांच्या आसपास किंवा अगदी चेहऱ्यावर देखील होऊ शकते.

इन्फेक्शनची लक्षणे | fungal infection information signs

सर्वात सामान्य म्हणजे खाज आणि त्वचेचा लालसरपणा किंवा खाजवलेल्या ठिकाणी फोड किंवा पुरळ होणे. या व्यतिरिक्त, जळजळ आणि डंख मारल्यासारखी भावना असू शकते किंवा वेगवेगळ्या ठिकणाहून त्वचा सोलवटल्यासारखी बाहेर येऊ शकते. कधीकधी पू भरणारे मुरुम देखील होऊ शकतात.

फंगलपासून बचावासाठी ‘हे’ उपाय करा | fungal infection treatment

थंड किंवा ओले कपडे घालणे टाळा. पावसात भिजल्यावर शरीर पूर्णपणे कोरडे करा आणि स्वच्छ व कोरडे कपडे घाला.

हात आणि पाय स्वच्छ ठेवा आणि ओले मोजे किंवा पादत्राणे घालणे टाळा.

जर एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर इतर निरोगी व्यक्तीने त्याचा टॉवेल, कंगवा, कपडे इत्यादी वापरू नका.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रभावित भागात कोणतीही क्रीम किंवा लोशन वापरा

पायात फंगल समस्या असल्यास शूज घालणे टाळा.

दररोज आंघोळ करा आणि शरीर स्वच्छ ठेवा.

सामान्य साबण किंवा शॅम्पूऐवजी मेडिकेटेड साबण आणि शॅम्पू वापरा.

सैलसर सुती कपडे घाला.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवावा.

आपले वजन संतुलित ठेवा.

जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांची एकदा तपासणी करा. अनेक वेळा हे प्राणी देखील अशा संसर्गाचे कारण बनू शकतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar