पुणे – आपण किती वर्षे जगलो यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचे आहे आपण कसे जगलो? जीवन जगताना महत्त्वाची असते ती गुणवत्ता. आजकालच्या विज्ञानाच्या युगात रोज नवनवीन शोध लागत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे एकंदरीतच माणसाचे आयुष्य वाढले आहे; परंतु याचीच दुसरी बाजू म्हणजे दिवसेंदिवस वाढणारी ज्येष्ठ नागरिकांची संख्या.
या सर्वच ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक स्थिती उत्तम असते का..? तर याचे उत्तर नाही असेच मिळेल. वैद्यकीय सर्वेक्षणाचे निकाल हादरे बसवणारे आहेत. स्थूलत्व, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयरोग इत्यादी आजारांचे वाढते प्रमाण केवळ हेच दर्शवते की, वयपरत्वे हे आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे.
हे सर्व आजार सहन करण्याची स्त्रियांची प्रतिकारशक्ती पुरुषांच्या तुलनेत कमी असते. पूर्वी ज्या काळात या आजारांवर उपचारपद्धती फार कमी प्रमाणात उपलब्ध होती तेव्हा स्त्रियांना चाळिशी गाठणेही अवघड होऊन जायचे; परंतु आज आमची स्त्रियांची चाळिशीतली पिढी आपल्या ज्येष्ठ मात्या-पित्यांचीही सेवा करते आणि मुलांचीही काळजी घेते. मुलांच्या संगोपनाबरोबरच घरातील वृद्धांचीही काळजी घेते. मात्र हे सर्व करत असताना त्यांनी स्वत: थकणे त्यांना मान्य नसते.
घरातील दोन पिढींचा पसारा सांभाळत असतानाच त्यांना स्वत:लाही वेळ द्यायचा असतो. आजवर करता न आलेल्या अनेक गोष्टी करायच्या असतात. जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो. मनातल्या इच्छा, अपेक्षांना मुर्त स्वरूप द्यायचे असते. म्हणूनच ही चाळिशीतील पिढी आज आपल्या आरोग्याबद्दल सतर्क होत आहे. कारण वय होणे म्हणजे काय असते हे त्यांना समजून घ्यायचे आहे. जग म्हातारे होत चालले आहे. वृद्धांची संख्या वाढत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने तर इशाराच दिला आहे की पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे वृद्धांची संख्या वाढणे हे विकसनशील देशांपुढील मोठे संकट बनून राहणार आहे. गेली काही वर्ष अशाच प्रकारच्या बातम्या वैद्यकीय नियतकालीकातून वाचायला मिळत आहेत.
वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत तुम्हाला जर हृदयरोग आणि कर्करोगाने गाठले नाही तर तुम्ही 80-90 वर्षांपर्यंत आरामात जगू शकता असा अधुनिक वैद्यकशास्त्राचा दावा आहे. म्हणजेच सेवानिवृत्त झाल्यानंतरही तुम्हाला चांगले 20-30 वर्षे आयुष्य जगायचे आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणून सन्मानाने जगायचे आहे. मग या बदलत्या परिस्थितीत चाळिशी उलटलेल्या आजच्या स्त्री-पुरुषांची मानसिकता नेमकी काय आहे हे जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे.
चाळिशी आली की वय झाले असे म्हणणे साफ चुकीचे आहे. कारण वय होण्याची पक्रिया आपण जन्मल्यापासूनच सुरू होत असते आणि वृद्धत्वाच्या बाबतीत म्हणाल तर केवळ शरीराच्या बाह्य लक्षणांवरून आपण असे म्हणत असू तर असे म्हणणे योग्य ठरणार नाही. थकवा येणे, कोणत्याही कामात उत्साह न वाटणे, त्वचेचा पोत बिघडणे, केस पांढरे होणे, दात पडणे, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार होणे, एकंदरीत चेहऱ्याची रया जाणे, धडधडणे केवळ असे होणे म्हणजे म्हातारे होणे नव्हे तर म्हातारपण हे ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून असते. पण तरीही काही अपरिहार्य, अटळ असे बदल होतातच.
वयापरत्वे होणारे बदल म्हणून आपण ते मान्य करायला हवेतच. यात दृश्य आणि अदृश्य असे दोन्ही प्रकारचे बदल जाणवतात. आजच्या विज्ञानाच्या युगात वृद्धत्व या विषयावरही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. स्त्रियांच्या आयुष्यातल्या उमलत्या वयापासून गर्भारपण, बाळांतपण, स्त्रीयांचे अनेक शारीरिक आजार, सिझेरियन, क्युरेटिन, हिस्टेरेक्टॉमी अशा अनेक शस्त्रक्रिया या सर्वांचा विचार करता किमान स्त्रियांना बहुतांश ज्या आजारांचा सामना करावा लागतो अशा आजारांची माहिती स्त्रियांना मिळणे आवश्यक आहे.
जगाचे सामाजिक, शैक्षणिक स्वास्थ्य, कौटुंबिक, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचे नैतिक परिचालन जपण्याचे काम स्त्री नेटाने करत असते. परंतु स्त्रीचे स्वत:चे व्यक्तित्व, तिचे अंतर्बाह्य आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
तिशीनंतरही सावधच राहा…
स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत असलेला हलगर्जीपणा आणि दिवसेंदिवस बदलत जाणारी जीवनशैली यामुळे स्त्रियांदेखील आता विविध गंभीर आजारांना बळी पडताना दिसत आहे. मात्र असे आजार उद्भवू नये म्हणून स्त्रियांनी तिशीनंतर काही चाचण्या करणं आवश्यक आहे. कित्येकदा आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात महिला वर्ग इतका गुंतलेला असतो की त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसतो.
आपल्या लहान-सहान दुखण्याकडे त्या दुर्लक्ष करतात परिणामी आजारी पडतात. खासकरून तिशी उलटल्यानंतर महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तरी काही चाचण्या नियमित तपासणी करणं गरजेचं आहे.
ब्रेस्ट कॅन्सर (Breast cancer) –
एकदा का तिशी उलटली की प्रत्येक स्त्रीने ब्रेस्ट कॅन्सरच्या (Breast cancer) बाबतीत जागरूक असणं आवश्यक असतं. या गंभीर आजारापासून बचाव होण्यासाठी महिलांनी स्वत:च आपली ब्रेस्ट (Breast cancer) चेक करणं आवश्यक आहे. म्हणजे काखेत कोणत्याही स्वरूपाची गाठ नाही ना, ब्रेस्टचा (Breast cancer) आकार किंवा त्वचेत काही बदल झाले आहेत का? निपल्समधून पाणी येणे, किंवा दुखणे, खाज येणे अशी काही लक्षणं दिसल्यास ताबडतोब एमआरआय किंवा मेमोग्राफी करणं आवश्यक आहे.
काळजी : तुमच्या कुटुंबात कोणाला अशा स्वरूपाचा आजार असल्यास तुम्ही प्रतिवर्षी ही चाचणी करून घेणं आवश्यक आहे.
गर्भाश (uterus)यासंबंधित आजार –
विवाहित स्त्रियांमध्ये गर्भाशायासंबंधित (uterus) आजार होण्याची शक्यता असते. सर्वाकल कॅन्सची भीती अधिक असते. म्हणून पेप्स्मीअर किंवा पेल्बिक अल्ट्रासाऊंड करणं आवश्यक आहे. कारण याद्वारे गर्भाशयाशी (uterus) संबंधित कॅन्सरपोषक पेशी दिसू शकतात.
काळजी : अनियमित मासिक पाळी, अतिरिक्त ब्लडिंग किंवा गाठी पडणे.. अशा स्वरूपाचा त्रास असलेल्यांनी विशेषज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.
ऍनिमिया (Anemia) –
भारतातील बहुतांश महिलांमध्ये रक्ताची कमतरता जाणवते. अनावश्यक थकवा जाणवू लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा होतात. नखं आणि डोळे अधिक पांढरे होतात. म्हणूनच वर्षातून एकदा सीबीसी (कम्पलीट ब्लड काऊंट) ही चाचणी करणं आवश्यक आहे. स्त्रियांनी आपल्या जेवणाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. रोजच्या जेवणात लोहयुक्त वस्तू
उदा. पालक, गाजर, बीट, सफरचंद, केळं, खजूर किंवा गुळाचा समावेश करावा. गर्भावस्थेनंतर किंवा गरोदरपणात आपल्या खाण्याकडे विशेषत: लक्ष द्यावं. कारण त्या दिवसांत योग्य प्रमाणात आहार मिळाला नाही तर स्त्रिया दगावण्याचाही धोका असतो.
ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) – हा आजार कुटुंबातील कोणाला झाला असेल किंवा तो अनुवंशिक असेल तर हा तुम्हाला होण्याचा धोका अधिक असतो. ज्यांचं वजन मुळातच अधिक असतं. त्यांना हा धोका अधिक असतो. तसंच मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. कारण हाडं, स्नायू आणि मांसपेशी त्यानंतर दुखायला लागतात. म्हणून मेनोपॉजनंतर डॉक्टरांकडे अवश्य जावं.
तुमच्या पैकी कोणाला अशा समस्या जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या शरीरातलं कॅल्शिअम वाढवणं आवश्यक असतं. तुम्ही ताबडतोब दूध, अंडी, फळं खाणं आवश्यक असतं. तिशीनंतर साधारणत: प्रत्येक महिलेला 1000 ते 1200 मिलिग्राम कॅल्शिअमची गरज असते. दररोजच्या जेवणातून हे मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाडं आणि मांसपेशीच्या मजबुतीसाठी व्यायाम किंवा औषधं घेणं गरजेचं आहे.
उच्च रक्तदाब (High blood pressure) –
तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आजकालच्या स्त्रिया उच्च रक्तदाबाच्या शिकार होतात. मेनोपॉजच्या अवस्थेमध्ये हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच नियमित रूपात रक्तदाबाची (High blood pressure) चाचणी करणं आवश्यक आहे. वजन अधिक असल्यास किंवा परिवारात हा आजार असल्यास विशेष काळजी घ्यावी. तसंच डॉक्टरांकडून योग्य आहाराचा सल्ला घ्यावा.
मधुमेह (Diabetes) –
तुमचं वजन वाढलं आहे, तुमच्या कुटुंबात कोणाला मधुमेह (Diabetes) असल्यास आणि तुम्हाला उच्च रक्तदाब असल्यास तुम्ही तुमच्या शरीराची विशेषत्वाने काळजी घेणं आवश्यक आहे. तीस वर्षानंतर तर वर्षातून एकदा तरी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी. विशेषत: तुम्हाला आई व्हायचं असेल तर अशा महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. कारण ती वाढल्यास नवजात बाळालाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थायरॉईड (Thyroid) –
थायराईडच्या (Thyroid) ग्रंथी गळ्याच्या खालच्या बाजूला असून त्यात टी-3, टी-4 असे स्रव स्रवत असतात. त्यांची मात्रा असंतुलित झाल्यास त्याचा परिणामा स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. परिणामी झटक्यात वजन वाढणं किंवा कमी होणं, थकवा येणे, त्वचा कोरडी होणे, चिडचिड होणे, उदास होणे, स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणं नजरेस येतात. गर्भावस्थेत थायरॉईड(Thyroid)संबंधी समस्या आढळल्यास नवजात शिशूलाही त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच तुमच्यामध्ये यापैकी कोणतंही लक्षण दिसल्यास ताबडतोब थायरॉईड (Thyroid) स्टिम्युलेटिंग हार्मोन्सची चाचणी करून घ्यावी.