Wednesday, April 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

चाळिशीमध्येही राहा फीट…

by प्रभात वृत्तसेवा
April 14, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वयाची ४० वर्ष गाठताना आपण मध्यमवयाकडे झुकत असता आणि या वयात आरोग्याच्या नवनवीन समस्या समोर येण्याची भीती आपल्याला नेहमीच सतावत असते. पण, आता हा ग्रह बाळगून राहण्याची गरज नसते. हे सर्व आता आधुनिक औषधे, आरोग्यपूर्ण व्यायाम आणि पोषक घटक यामुळे ४० वर्ष वयातील लोक सुद्धा आता अधिक जीवन जगण्याची आशा बाळगू शकतात, तसेच आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची संधी प्राप्त करू शकतात.

चाळिशी हे एक असे वय आहे, जे जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ) च्या मते हे मध्यमवय म्हणून गणले जाते. ४५ किंवा अधिक वयाच्या लोकांसाठी फिट्नेसही महत्त्वपूर्ण असते, हाच नियम महिलांसाठीही लागू होत असतो. हे वय असे असते की, ज्यावेळी लोकांना अधिकाधिक जुने आजार, कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, डेम्नेशिया किंवा संधीवात इत्यादी आजार बळावलेले दिसतात.

पुरुषांमध्ये सुद्धा अधिक प्रमाणातील बॉडी मास (रक्तवाहिन्या) आणि बीएमआर कमी होताना तर महिलांमध्ये हाडे ठिसूळ होणे, अशा समस्या दिसून येतात, परिणामी हाडे मोडण्याचा धोका अधिक असतो. कधीकधी पचनसंस्थेचे विकार वाढून पोषण कमी होऊ लागते. भारतात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात वाढताना दिसते. हे प्रमाण इतके आहे की, प्रत्येक ३३ सेकंदांत किमान एक व्यक्ती दगावताना दिसते. सध्या देशामध्ये वर्षभरात २० लाख लोकांचा मृत्यू हा हार्ट अ‍ॅटॅकने होताना दिसून येतो. यातून अधिक धक्कादायक गोष्ट अशी की यातील अधिकतर रुग्ण हे तरुण किंवा अगदी चाळिशीत पदार्पण केलेले आहेत. चाळीशीत काही लोकांची दृष्टी ही अधू होऊ लागताना दिसते. मध्यमवयात आरोग्य पूर्ण राहिल्यास तुमचे निवृत्तीचे वय दुप्पट होण्यास मोठी मदत होऊ शकेल.

वयाच्या चाळिशीत फिट्नेस कमी होताना मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. पण, जर व्यायाम केला नाही तर वय वाढण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. म्हणूनच हे योग्य वय असते की, ज्यावेळी आपण व्यायाम सुरू करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे मोबिलिटी वाढून स्वतंत्र जीवन जगणे सोपे जाते. यामुळे शक्ती, समतोल आणि समन्वय साधला जाऊ शकतो, परिणामी आपण पडण्याचा धोका कमी होतो. हे सर्वाना माहीत आहे की, सीव्हीडी, टाईप २ मधुमेह, स्थूलपणा आणि काही प्रकारचे कॅन्सर हे व्यायामाने टाळणे शक्य होते.

चाळिशीत शरीराची बळकटी कमी होण्याची सुरुवात होत असते आणि शरीरात चरबी वाढायला सुरुवात होत असते. पुरुषांमध्ये ही चरबी पोटापाशी जमा होऊ लागते तर महिलांमध्ये ही चरबी शरीरात सर्वत्र पसरते. काही प्रकारच्या व्यायांमांचा लाभ हाडे, सांधे यांना होण्याबरोबरच पचनशक्ती सुधारण्यावरही होत असतो. यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते, त्यामुळे डिप्रेशन सारख्या आजारांपासूनही दूर राहणे शक्य होते.

जर तुम्ही सध्या व्यायाम करत नसाल, तर तुम्ही किमान आठवडय़ातून पाचवेळा रोज ३० मिनिटांपर्यंत व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे शक्ती आणि समतोल राहू शकतो. व्यायामा बरोबरच नृत्य, योग, ताईची आणि सूर्यनमस्कार इत्यादींचा समावेश केल्यास उत्तम.

जसजसे वय वाढू लागते, तसतसे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. जन्मत:च मानवाच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पण, ४० वर्षापर्यंत हे प्रमाण पुरुषांमध्ये ६० टक्के तर महिलांमध्ये ५२ टक्के इतके राहते. जगण्यासाठी तुमचे शरीर पाण्यावर अवलंबून असते. प्रत्येक पेशी, कण आणि शरीराच्या अवयवांना नीट काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. उदाहरणार्थ, तुमचे शरीर हे पाण्याचा उपयोग हा तापमान नियंत्रणासाठी, शरीरातील नको त्या वस्तू बाहेर टाकण्यासाठी तसेच सांध्यांमध्ये वंगण म्हणून करताना दिसतो. संपूर्ण आरोग्यासाठी पाण्याची गरज असते, म्हणूनच दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे.

अन्य पेये आणि रस यांमुळे तुम्ही ताजेतवाने राहण्यास मदत होते. पण काहींमुळे तुमच्या आहारातील कॅलरीजही वाढू शकतात. फळे आणि भाज्यांचे रस, दूध आणि हर्बल चहांचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता. कॅफिन युक्त पेयांचा सुद्धा म्हणजेच चहा, कॉफी आणि सोडा यांचा वापरही तुमच्या पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी करू शकता. योग्य प्रमाणात कॅफिन असल्यास (२०० ते ३०० मिलीग्रॅम) अधिकतर लोकांसाठी ते घातक नसते.

वयाच्या चाळिशीत योग्य आरोग्यपूर्ण असा आहार घेणे हे एक महत्त्वपूर्ण तत्त्व आहे. योग्य आहार घेऊन तुम्ही चाळिशीतही चांगले आयुष्य मिळवू शकता. होल ग्रेनचे सेवन केल्यामुळे आरोग्याशी संबंधित दोन चांगल्या गोष्टी घडतात : एक म्हणजे रक्तदाब वाढतो तर दुसरा म्हणजे मेटॅबॉलिझमची प्रक्रिया मंदावण्यासाठी व्हाईट ब्रेड सारख्या रिफाईन्ड धान्य आणि व्हाईट राईसच्या ऐवजी संपूर्ण धान्यांचा वापर (होल व्हीट ब्रेड, ब्राऊन राईस आणि ओट्स) यांचा वापर केल्यास तुमच्या शरीरातील फायबरची गरज पूर्ण होण्यास मदत होते. फायबरचा समावेश भोजनात केल्याने वजन वाढीवर नियंत्रण मिळतेच पण, त्याचबरोबर वजन कमी होणेही थांबते.

काही अभ्यासातून असे दिसून येते की, होल ग्रेन्सच्या वापरामुळे शरीरात पोटॅशिअम साठवले जातेच पण, त्याचबरोबर यांतील मिनरल्समुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. मिठाचे प्रमाण कमी करा, कारण यामुळे रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होऊन शरीरात पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. असे सुद्धा सुचवण्यात येते की, फळे आणि भाज्यांचे अधिक सेवन करावे. दूध आणि अन्य डेअरी उत्पादनांचा वापर केल्याने शरीरात कॅल्शियमचा समतोल राहतो. मांसाहारी व्यक्तींसाठी मटण, अंडी, मासे यामुळेही अधिक प्रमाणात प्रोटिन्स उपलब्ध होते.

जर आपण हे चांगले नियम पाळले तर वयाच्या चाळिशीत सुद्धा तुम्ही चांगले आणि उर्जायुक्त आयुष्य जगू शकता. तर मग आता कमी काम करणे विसरून जा, तुम्ही आता तुमच्या मेहनतीची फळे चाखू शकता आणि आयुष्याचा अनुभव नक्की मिळवू शकता.

Tags: arogya jagarexercisefitness at 40food and diethealthyoga
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar