Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अखेर तो दिवस उजाडला !सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण सुरू

by प्रभात वृत्तसेवा
January 12, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अखेर तो दिवस उजाडला !सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण सुरू
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनरपैकी तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेने पोलिस बंदोबस्तामध्ये 4 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाले आहे. तर यापुर्वी इन्स्टिट्यूट च्या परिसरात कंटेनरची पूजा परि मंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून करण्यात आली. तर यावेळी कंटेनर रवाना होताना. गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी 8 वाजता रवाना होणार आहे. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गोवाहाटी येथे जाणार आहे. पुणे विमानतळावरून कोविशील्ड लसीचे देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या भागात जाणार आहे. देशात प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

#WATCH | Three trucks carrying Covishield vaccine reached Pune airport from Serum Institute of India’s facility in the city, earlier this morning.

From the airport, the vaccine doses will be shipped to different locations in the country. The vaccination will start on January 16. pic.twitter.com/v3jk4WUyyq

— ANI (@ANI) January 12, 2021


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या गाडीची पुजाही करण्यात आली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. आज अशाप्रकारची आणखी तीन वाहने लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणे सुरु करण्यात आले आहे.

पुणे झोन-5 च्या डीसीपी नम्रता पाटील यांनी बोलताना सांगितले की, “कोरोना वॅक्‍सिनची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे.”पुणे एअरपोर्टहून वॅक्‍सिनच्या एअर ट्रान्सपोर्टची जबाबदारी सांभाळणारी कंपनी एसबी लॉजिस्टिकचे एमडी संदीप भोसले यांनी सांगितले की, एकूण आठ फ्लाइट्‌स कोविशील्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. पहिली तुकडी दिल्ली विमानतळासाठी रवाना करण्यात आली आहे.

A total of 8 flights will transport Covishield vaccine from Pune International Airport to 13 different locations today. The first flight will leave for Delhi airport: Sandip Bhosale, MD of SB Logistics, the company handling air transportation of the vaccine from Pune airport https://t.co/1ihftsPjza

— ANI (@ANI) January 12, 2021


कोविड-19 च्या लसीची पहिली बॅच आज गुजरातमध्ये पोहोचणार आहे. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लसींची पहिली बॅच उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांना सांगितले की, लसीकरणाशी संबंधित सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. गुजरातमध्ये कोविड-19 लसीकरण अभियान 25,000 सेंटर्सवर सुरु होणार आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी 16 जानेवारी रोजी गुजरातच्या 287 सेंटर्सवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. यादरम्यान अहमदाबाद आणि राजकोटमधील दोन ठिकाणांवरील डॉक्‍टर्स आणि लस टोचून घेणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधतील.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvasmitaayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in Indiacosmetic productsCOVID-19moisturizerobesityprimerose oilscrubskin carewinter season
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar