नववा महिना लागताच किंवा आठव्यातच गरोदर स्त्रीने प्रसूतीगृहात जाऊन यावे. प्रसूतीचे टेबल पाहावे. नवजात अर्भकांसाठी असलेली व्यवस्था पाहावी. त्यामुळे प्रसूतीविषयीची भीती कमी होते. मनाची तयारी होते. स्वसंमोहन तंत्राचा वापर करावा. स्वसंमोहन तंत्राने सोपी प्रसूती होऊ शकते. टोरॅंटो विद्यापीठातील डॉ. पामेला यांनी या स्वरसंमोहन तंत्राचा वापर करून 56 गर्भवती स्त्रियांची सुलभपणे सुटका केली. या तंत्रामुळे गर्भवती स्त्री शांत राहून तणावरहित स्थितीत बाळाला जन्म देते.
-सुजाता टिकेकर
खरे पाहता एवढे घाबरण्यासारखे किंवा काळजी करण्यासारखे काही नाही. बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया ही निसर्ग निर्मित असते. स्त्रीला तो शारीरिक आणि भावनिक असा सुखद अनुभव असतो.
प्रसूतीची सूचना अशी मिळते
प्रसूती होण्याच्या काळापूर्वी थोडा हलका व्यायाम आणि विश्रांती आवश्यक असते. जर तुम्ही सहजतेने झोपू शकत नसाल तर प्रसूतीकळांच्या अवधीत बिछान्यावर सारखेच झोपू नका त्यामुळे प्रसूती लांबण्याची शक्यता असते. थोडा व्यायाम करा. उदा. तीन उशांवर डोके ठेवा व गुडघे टेकून वज्रासनात बसावे. भिंतीला धरून वाका. दोन्ही हात भिंतीला सरळ टेकवून त्याआधारे वाकून उभे राहा. संगीत ऐका, आपल्या जोडीदारासोबत राहा व त्यांच्याकडून ऍरोमा थेरपीचा मसाज करून घ्या. 20 ते 30 मिनिटांच्या अंतराने पाठीतून आणि ओटीपोटातून नियमित कळा येणे सुरू होते.
गर्भाशयाच्या मुखाशी थोडे थोडे स्रवू लागते. गरोदर स्त्रीने चक्राकृती रिलॅक्सेशन करावे. दोन्ही हातांचे तळवे चेहऱ्यावर ठेवून आरामात गादीवर झोपावे. डोळे बंद करून नजरेसमोर एक प्रकाशबिंदू आणावा आणि गरोदर स्त्रीने आपले डोके, चेहरा मान, छाती, खांदे ओटीपोट, मांड्या, गुडघे, ढोपर, तळवे चक्राकृती फिरते आहे अशी कल्पना करावी. शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल सोडावा.
शांततापूर्ण प्रसूतीसाठी ध्यानधारणा
ध्यानधारणेच्या आधारे गर्भिणीला प्रसूती दरम्यान वेदना कमी होऊ शकतात. तसेच ध्यान धारणेमार्फत प्रसूतीपूर्व काही तास गरोदर स्त्री आपल्या बाळाशी सुसंवाद साधू शकते.
प्रतिमा ध्यानधारणा
आपले मन दुसऱ्या विचारात गुंतवावे. त्यानंतर हळूहळू एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित करावे. सरावाने तुम्ही आपले मन 10 ते 20 मिनिटे ठराविक गोष्टीवर उदा. देवाची प्रतिमा, ओम, यावर एकाग्र करू शकता.
ध्वनी किंवा संगीत ध्यान धारणा
अशी कल्पना करावी की, आपण आपले आवडते संगीत ऐकत आहोत आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे. असे आपल्या आवडीचे कोणतेही मन प्रसन्न करणारे संगीत ज्याने आपले मन शांत राहील उदा. ओम, देवी श्रीराम भजन वगैरे. ज्या संगीतात हृदयाच्या ठोक्याप्रमाणे प्रत्येक मिनिटाला 60 ठोके आहेत ते प्रसूतीसाठी येणाऱ्या स्त्रियांसाठी अतिशय चांगले असते असे मानतात. त्याचप्रमाणे मंद शास्त्रीय संगीत किंवा सतार, सरोदही चांगले. संगीतातील आलाप तुमच्या शरीराला शिथिल करतात. त्यासाठी एखाद्या आवडत्या रागाची निवड करावी व ते आलाप हळूहळू तुमच्या शरीरात भिनवा. दुसरे कोणतेही विचार मनात न येण्यासाठी हेच संगीत सतत आठवत राहावे. ध्यानधारणेमुळे त्या संगीताच्या स्वरलहरींचे गरोदर स्त्रीभोवती अभेद्य सुरक्षा कवच तयार होते.
विधानात्मक कल्पना ध्यानधारणा
ओम ची मनात उजळणी करावी. त्याचेच केशरी रंगाचे रूप आठवावे. आपल्या मनात वाईट विचार येऊ देऊ नयेत. शांत राहून सकारात्मक विचार करावेत.सतत मनात अगदी सहजसुलभ वेदनारहित प्रसूतीची छान कल्पना गुंफावी! मानसिक तणाव घेऊ नये. ज्यामुळे प्रसूती लांबू शकते. तेव्हा मनावर ताण असू नये. बरोबरच्या व्यक्तीने गरोदर स्त्रीला चांगल्याच गोष्टी सांगून तिला चिअरअप् करावे. ही सुलभ वेदनारहित प्रसूतीची पहिली पायरी आहे. हे ताण कमी करण्यासाठी नवव्या महिन्यापासून प्रसूती संदर्भात काही सोपे व्यायाम केले पाहिजेत.
जेव्हा गरोदर स्त्री ही शांत बसलेली असेल तेव्हा तिने अशी कल्पना करावी की तिची प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे. त्यासाठी तिची शारीरिक व मानसिक तयारी झालेली आहे. गरोदर स्त्रीने हॉस्पिटलमध्ये ताणमुक्त मनःस्थितीत राहावे.
श्वासोच्छ्वासाचे काही व्यायाम प्रकार करीत राहावे, जप करत चालत राहावे., गाणे ऐकत राहावे. स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवून आपले बाळ जन्माला यायची वाट पाहात आहात. प्रसूतीवेदना सुरू होऊन कळा वारंवार येत आहेत.
या गोष्टींचा विचार करा :
प्रत्येक कळेनुसार माझे गर्भाशय प्रसरण पावून बाळ बाहेर येण्याचा प्रयत्न करते आहे. माझा श्वासोच्छ्वास शांतपणे उत्तम सुरू आहे. माझे हात, पाय, चेहरा, खांदे, पोट, ओटीपोट शिथिल झाले आहे. माझ्या प्रत्येक कळेसरशी बाळ बाहेर येण्याच्या मार्गावर आहे. मी आणि माझे बाळ हे सगळे अगदी सहजरीत्या करतो आहोत. माझ्या योनी मार्गातून बाळाचे डोके बाहेर आले आहे आणि आता पूर्णतः माझे बाळ बाहेर आले आहे. किती सुंदर आहे माझे बाळ! असाच गरोदर स्त्रीने सतत विचार करावा.
चिनी व्यायाम पद्धती क्वीगॉंग आणि ताईची :
ही चीनमधील गर्भवती स्त्रियांसाठी एक व्यायामाची पद्धत आहे. यामध्ये गरोदर स्त्री आरामात एका जागी बसते आणि आपल्या शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावर विशेषतः गर्भाशयावर लक्ष केंद्रित करते.. यामुळे गरोदर स्त्रीला बाळाशी सुसंवाद साधता येतो.आणि जणू काही सर्व नीट होईल घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर आहे असा धीर बाळ देते.
चीगॉंगचे दोन प्रकार :
प्राचीन चीनमधील ही चिकित्सा पद्धती आहे. शरीरातील ऊर्जा केंद्रित करणे, शरीरावरचा ताण हलका करणे व श्वासोश्वासात सुधारणा करणे ह्यासाठी ह्या मार्शल आर्टचा उपयोग होतो. या चिकित्सेत शरीरातील ऊर्जा जिला ची म्हणतात व जी अनेक मेरिडिअन्सधून शरीरात वाहात असते, यांची सांगड घालून शरीरात बदल घडवून आणता येतात. दोन प्रकाराने हे तंत्र अवलंबता येते. पहिल्या प्रकारात रिलॅक्स अवस्थेत बसून आपली मानसिक ऊर्जा केंद्रित करून तिचा प्रवाह गर्भाशयातीले बाळापर्यंत नेला जातो. दुसऱ्या प्रकारात श्वासोश्वासाच्या वेगवेगळ्या तंत्रांना नृत्यासारख्या हालचालींशी जोडून चीफ मेरिडिअन्समधून चॅनेल केले जाते. आजकाल चीनमध्ये जवळजवळ सर्व हॉस्पिटल्स्मधून चीगॉंगचे प्रशिक्षण गर्भवतींना दिले जाते.
रोगप्रतिकारक नैसर्गिक चिकित्सापद्धती
गरोदरपणात, बाळंतपणात व नंतरही उद्भवणाऱ्या छोट्या छोट्या तक्रारींवर परिणामकारक व सुरक्षित अशा काही नैसर्गिक चिकित्सा असतात. ज्यांच्यामुळे शरीर व मनाची एकरूपता साध्य होते व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
ऍक्युपंक्चर व ऍक्युप्रेशर :
ऍक्युप्रेशर (ह्यालाच डहळर्रीीीं ही म्हणतात.) मध्ये अंगठा व बोटांचा वापर करून त्वचेवर दाब दिला जातो.पाच हजार वर्षांपूर्वीपासून चीनमध्ये ह्या चिकित्सेचा उगम झाला. शरीरातील जीवनशक्ती (उहळ) जी 13 मेरिडिअनमधून शरीरात वाहते तिला ह्या चिकित्सेत उत्तेजित केले जाते. अतिशय बारीक व नाजूक सुयांनी त्वचेच्या वरच्या थरावर टोचून हे मोरिडिअन उत्तेजित केल्यामुळे शपवीेहिळपी ीशश्रशरीश होतात व वेदना शमातात. मात्र, ह्या दोन्ही चिकित्सा तज्ज्ञांकडून करून घ्याव्यात. गरोदरपणात पॉईंटस्ना उत्तेजित करायचे नसते.
ऍरोमाथेरपी : सुगंधाच्या ह्या उपचारांमध्ये शीीशपींळरश्र ेळश्री वापरली जातात. फुलांपासून, फळांपासून, खोडांपासून, पानांपासून एका विशिष्ट पद्धतीने ही तेले काढले जातात. ह्या तेलांच्या मसाजामुळे मनावरचा ताण हलका होतो, मन, शरीर व आत्म्याचा समतोल साधला जातो. एनर्जीे, रक्तपुरवठा सुधारणे, अशुद्ध रक्ताचे ङूाहि द्वारा उत्सर्जन होणे, विष बाहेर टाकणे तसेच शरीरातील विद्युतचुंबकीय क्षेत्रातील असमतोल दूर करणे, मज्जातंतू व हार्मोन्स ह्यावर चांगला परिणाम करणे असे अनेक फायदे ह्या थेरपीद्वारा मिळतात. ही तेले इरीश ेश्रळ मध्ये मिसळून मसाजने किंवा नाकाने हुंगून किंवा आंघोळीच्या पाण्यात टाकून किंवा कॉम्प्रेससाठी व पाण्याची वाफ करून (तरर्िीीेळीशी) वापरली जातात.
विशेषतः मानसिक तक्रारींसाठी ऍरोमा थेरपीचा वापर करता येतो. कोणतीही थेरपी गरोदर स्त्रीने वापरायच्या आधी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. मळमळ होत असल्यास ग्लासभर गोड पाण्यात एक थेंब पेपरमिंट तेलाचा टाकून ढवळणे व घेणे किंवा चमचाभर साखरेवर एखादा थेंब टाकून तो घेणे. मनावरील ताण व मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी रेस्क्यु (ठशीर्लीश) रेमेडीचा वापर खूपच फायदाचा ठरतो. गरोदर स्त्रीच्या छातीत जळजळत असेल तर ग्लासभर गोड पाण्यात पेपरमिंट, रोझ किंवा चंदन तेलाचा एखादा थेंब टाकून हलवून ते पाणी घेतल्यास आराम पडतो.
तसेच पोटावर लॅव्हेंडरचा कॉम्प्रेस दाबावा. एका वाडग्यात गरम पाणी घेवून त्यात 2 थेंब लॅव्हेंडर ऑईल मिसळावे व एखादा नॅपकीन त्यात भिजवून, पिळून, घेऊन, उलगडून पोटावर ठेवावा व त्यावरच दुसरा कोरडा टॉवेल दाबून घ्यावा व अर्धा तास ठेवावा. गरोदर स्त्री जर लवकर थकत असेल तर साठ मि.ली. तीळ किंवा खोबरेल, बदाम तेलात बरगॅमॉट तेलाचे 15 थेंब, जेरॅनियम तेल 5 थेंब व चंदन तेल 10 थेंब टाकून मिसळावे व यातील जरूर तेवढ्या झोपण्यापूर्वी सर्वांगाला मसाज करावा.
गरोदरपणात घरातील वातावरण प्रसन्न व निर्जंतूक राखण्यासाठी एखाद्या वाटीत कडक गरम पाणी घेऊन त्यात बरगॅमॉट, जेरॅनियम, लॅव्हेंडर किंवा रोझ तेल ह्यापैकी कुठल्याही तेलाचे 7-8 थेंब टाकून एका कोपऱ्यात ठेवून द्यावे. गरोदर स्त्रीला प्रसन्न वाटावे म्हणून लॅव्हेंडर, पेपरमिंट, ऑरेंज, लेमन, मेलिसा, रोझवुड, लेमनग्रास ह्यापैकी कुठल्याही तेलाचे 5-6 थेंब आंघोळीच्या पाण्यात टाकल्यास ताजेतवाने तर वाटतेच परंतु लॅव्हेंडरसारख्या तेलाच्या वापरामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी उत्तेजित होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढते. बऱ्याचदा जसजसे दिवस भरत येतात तसतशी अस्वस्थता वाढू लागते. अशावेळी शांत झोप ही गरोदर स्त्रीला दुर्मीळ होऊ लागते.
तेव्हा ऍरोमा थेरपी मदतीला येते. लॅव्हेंडर तेलाचे 4-5 थेंब रूमालावर घेऊन दीर्घ श्वासाने हुंगावेत व उशीजवळ रूमाल ठेवावा किंवा बोटावर एक थेंब पसरून मान व डोक्याच्या मधल्या भागात मसाज करावा. गरोदर स्त्रीला जर सर्दी व खोकला खूप झाला असेल तर एखाद्या भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्या लॅव्हेंडर, निलगिरी, लेमन व टी ट्री तेलाचे प्रत्येकी 3 थेंब टाकून ह्या पाण्याची वाफ 12 मिनिटे घ्यावी.
ऍरोमा थेरपी वापरताना अशी काळजी घ्यावी :
ऍरोमा थेरपीतील तेल जशीच्या तशी वापरू नयेत. ती उग्र असतात. त्याने त्रास होऊ शकतो. ती तीळ, खोबरेल, बदाम, ऑलिव्ह तेल या सारख्या बेस
तेलामध्ये मिसळून वापरावीत. ह्या तेलांचा दर्जा उत्कृष्ट असायला हवा. तेलाचा सुगंध गुणकारी असतो म्हणून ही घट्ट झाकणांच्या गडद बाटलीत सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावीत. शक्यतो काचेच्या बाटल्या असाव्यात. ही तेले महाग असतात म्हणून जपून हाताळावीत सुरुवातीचा वापर अल्प प्रमाणात करून पाहावा. गरोदरपणात ऑरिगॅनम, क्लेरीसेज (बाळंतपणात वापरायचे) सव्होरी, थाईम, बिंटरग्रीन, ब्रासिल, क्लोव्ह, हिसॉप, लेमनग्रास, मार्जोरम, मिरे, सिनॅमॉन व पेनिरॉयल तेल. ही ऍरोमा थेरपी तेलं वापरण्याचे टाळावे.
ऍरोमा थेरपीचे फायदे पोटावरचे डाग जातात : 55 मि.ली. तीळ तेलात, 12 मि.ली. व्हीटजर्म किंवा जोजोबा तेल आणि 22 थेंब लॅव्हेंडर तेल व 8 थेंब नेरोली तेल टाकून, त्यातील तेलाने रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ असा तीनवेळा पोट व मांड्याला अलगद मसाज करावा.
बाळंतपणातील वेदनेवर : 55 मि.ली. तीळ तेलात क्लेरीसेज तेलाचे 15 थेंब, रोझ तेलाचे 8 थेंब व यॅलॅंग तेलाचे 9 थेंब टाकून, हलवून त्यातील तेलाने पाठीच्या खालच्या भागात दाबून मसाज करावा. दोन कळांच्यामध्ये अधूनमधून मसाज करावा. सतत करण्याची गरज नाही. तसेच क्लोरीसेज तेलाचे चार थेंब वाटीभर गरम पाण्यात मिसळून त्यात नॅपकीन भिजवून पिळून तो उलगडून पोटावर अलगद दाबावा व वरचेवर बदलावा किंवा वरील तेलाने पोटावरही अलगद मसाज करावा.
स्तनात दूध साकळले असल्यास : पाऊण लिटर थंड पाण्यात जेरॅनियम तेल 2 थेंब, लॅव्हेंडर तेल 2 थेंब व रोझ तेल 3थेंब टाकून, हलवून त्यात नॅपकीन भिजवून, पिळून तो स्तनांवर दाबून ठेवावा ज्यामुळे तेथील उष्णता व वेदना कमी होते. वरचेवर हा कॉम्प्रेस बदलावा.
बाळंतिणीचा मसाज : 55 मि.ली. तीळ तेलात व्हिटजर्म तेल 12 मि.ली. रोझवूड तेल 22 थेंब, ऑरेंज तेल 6 थेंब, जेरॅनियम तेल 6 थेंब मिसळून त्यातील तेलाने सर्वांगास मसाज करावा. मात्र, ओटीपोटावर दाब देऊ नये.
मुळव्याधीवर : सिटस् बाथ, प्लॅस्टिक टबमध्ये बस्तिप्रदेश बुडवून बसावे. यामध्ये पाणी घेऊन त्यात 8 थेंब केड तेल टाकून त्यात बसावे.
मुखदुर्गंधीसाठी : पाव लिटर पाण्यात पेपरमिंट 1 थेंब, लिंबू तेल 1 थेंब, बडिशेप तेल 1 थेंब टाकून ह्या पाण्याने दिवसातून 2-3 वेळा गुळण्या कराव्यात.
बाळाच्या पोटात दुखणे : एका कुंड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन थेंब कॉमोमाईल तेलाचे टाकून हलवून त्यात छोटा नॅपकीन भिजवून पिळून तो पोटावर पसरून दाबावा व त्यावर कोरड्या नॅपकीनची घडी अलगद दाबावी व अर्धा तास ठेवावे. लगेचच बाळ रडायचे थांबून झोपी जाते.
बाळाच्या त्वचेवर पुरळ : बाळाला उष्णतेने त्वचेवर पुरळ येतात. आंघोळीच्या पाण्यात दोन थेंब लॅव्हेंडर तेल टाकावे.
बाळासाठी मसाज : 55 मि.ली. तीळ तेलात व्हिटजर्म तेल 12 मि.ली., जेरॅनियम तेल 6 थेंब, ऑरेंज तेल 2 थेंब, लव्हेंडर तेल 12 थेंब मिसळून ह्या तेलाने संध्याकाळी मसाज करावा. अंगावर 10 ते 12 तास हे तेल राहू द्यावे.
योग : भारतातील प्राचीन अष्टांग योग साधनेतील योगासने, प्राणायाम, ध्यान ह्यांच्या नियमित साधनेने रक्ताभिसरण सुधारणे, उत्सर्जन सुधारणे, श्वासोश्वासाची क्रिया अधिक सक्षम करणे व मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक ऊर्जा वाढवणे शक्य होते. ह्यावर शास्त्रीय संशोधन करून त्याची परिणामकारकता सिद्ध केलेली आहे.