Facts about Bee | डंख मारणाऱ्या प्राण्यांची/ कीटकांची संख्या खूप जास्त आहे. जवळपास एक हजाराहून अधिक आहेत. कारण प्रत्येक जीव स्वतःच्या रक्षणासाठी डंख वापरतो. आणि अनेक जीव असे आहेत, जे डंख अनेक वेळा वापरू शकतात. म्हणजेच, ते एखाद्याला एकापेक्षा जास्त वेळा डंक देऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मधमाशी हे करू शकत नाही, मधमाशी फक्त एकदाच चावा घेऊ शकते. आणि हा डंख फक्त मादी मधमाशी सोबत असू शकतो. यामागचं कारण काय ? चला तर, जाणून घेऊया.
इतर प्राण्यांच्या नांगीप्रमाणेच मधमाशीचा डंख सुईसारखा असतो. पण मधमाशीचा डंख हा दुहेरी करवतीचा असतो. मधमाश्या त्यांच्या डंखाचा वापर करून मानव आणि प्राण्यांना पळवून लावतात. जेव्हा मधमाश्या डंख मारतात, तेव्हा मधमाशीच्या डंखाने शरीरातील पेशी नष्ट करणारे विष बाहेर पडते. पण त्याच्या वेगळ्या रचनेमुळे डंख मारल्यानंतरही मधमाश्या आपल्या शरीरातून किंवा कोणत्याही त्वचेतून डंख काढू शकत नाहीत.
म्हणजे डंख त्वचेत अडकतो आणि हा डंख काढण्यासाठी मधमाश्या खूप प्रयत्न करतात. खूपदा डंख काढण्याच्या प्रयत्नात मधमाशीचा जीवही जातो. त्यामागील कारण म्हणजे त्यांची पचनसंस्था या स्टिंगशी जोडलेली असते. कारण त्यांचा डंख फक्त शरीरातच राहतो. आणि त्यामुळे मधमाशी मरते.
मधमाशी आपल्या पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी डंख वापरते. पण एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मधमाशांचा मृत्यू डंख मारल्यानंतरच होईल याची शाश्वती नाही. कारण मधमाशांचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा डंख शरीरात राहतो. त्यामुळे त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम बाहेर येते. आणि मधमाशी मरते. पण काही मधमाश्याही आपले डंख प्रयत्नपूर्वक काढतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू होत नाही.
The post Facts about Bee | माणसाला डंख मारल्यावर मधमाश्या मरतात? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat.