Friday, May 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Eye Structure: बोलके डोळे… रचना, कार्य आणि दृष्टीमागचं जाणून घ्या विज्ञान!

by
February 24, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Eye Structure: आपल्याला हे सुंदर जग दाखवणारे डोळे हे निसर्गाने दिलेले अनमोल वरदान आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा म्हणजे डोळे. आनंद, दुःख, राग, प्रेम अशा भावना शब्दांशिवाय व्यक्त करण्याचे सामर्थ्य डोळ्यांत असते. बाहेरच्या जगातील सुमारे ८० टक्के माहिती डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते. म्हणूनच म्हटले जाते दृष्टी असेल तरच सृष्टी दिसते.

डोळा हा साधारण २४ मिमी व्यासाचा गोलाकार अवयव आहे. आकाराने लहान असला तरी त्यामध्ये अनेक सूक्ष्म भाग असतात. कवटीची हाडे, भुवया, पापण्या, पापण्यांचे केस आणि अश्रू हे सर्व डोळ्यांचे नैसर्गिक संरक्षण करतात.

डोळ्याचा बाह्य भाग पाहिला तर पापण्या धूळ, वारा आणि जास्त प्रकाशापासून संरक्षण करतात. पापणी आणि डोळा यामधील पातळ पडद्याला नेत्रश्लेष्मा म्हणतात. हा देखील जंतू आणि कचऱ्यापासून डोळ्याचे रक्षण करतो.

डोळ्याच्या पुढील बाजूस पारदर्शक नेत्रपटल म्हणजे बुबुळ असते. हे घड्याळाच्या काचेसारखे काम करते. प्रकाशाचे किरण एकत्र करून आत पाठवणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. या पटलाची पारदर्शकता चांगली असेल तरच दृष्टी स्पष्ट राहते. तसेच अतिनील किरणांपासूनही हे संरक्षण करते.

बुबुळाभोवती दिसणारा पांढरा भाग म्हणजे श्वेतपटल. हा डोळ्याचा मजबूत बाहेरील थर आहे. डोळ्याचा रंग ठरवणारे पटल म्हणजे वर्णपटल. त्याच्या मध्यभागी असलेल्या गोल छिद्राला बाहुली म्हणतात. प्रकाश जास्त असेल तर बाहुली लहान होते आणि कमी प्रकाशात मोठी होते. यामुळे योग्य प्रमाणात प्रकाश आत जातो.

बाहुलीच्या मागे पारदर्शक भिंग असते. हे भिंग लवचिक असल्याने दूर आणि जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. डोळ्यातील स्नायू आकुंचन-प्रसरण करून प्रतिमा योग्य ठिकाणी केंद्रित करतात.

डोळ्याच्या आतला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दृष्टीपटल, ज्याला रेटिना म्हणतात. येथे पडणारी प्रकाशाची प्रतिमा विद्युत संदेशांमध्ये रूपांतरित होते. हे संदेश ऑप्टिकल मज्जातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात. दृष्टीपटलात रॉड आणि कोन प्रकारच्या पेशी असतात. रॉड पेशी प्रकाशाची तीव्रता ओळखतात, तर कोन पेशी रंग आणि तपशील सांगतात. दृष्टीपटल निरोगी राहण्यासाठी आहारात जीवनसत्त्व अ आवश्यक असते.

डोळ्यांकडून आलेली माहिती मेंदूतील व्हिज्युअल कॉर्टेक्स या भागात पोहोचते. येथे दोन्ही डोळ्यांची प्रतिमा एकत्र करून पूर्ण आणि त्रिमितीय चित्र तयार होते. त्यामुळे वस्तूचा रंग, आकार आणि अंतर याचे अचूक ज्ञान होते.

डोळ्यांचे अंतर्गत आणि बाह्य असे स्नायू असतात. अंतर्गत स्नायू प्रकाश आणि फोकस नियंत्रित करतात, तर बाह्य स्नायू डोळ्यांची दिशा ठरवतात. दोन्ही डोळे एकाच वस्तूकडे स्थिर राहावेत यासाठी हे स्नायू समन्वयाने काम करतात.

डोळ्यांमध्ये काही तक्रारी जाणवल्यास नेत्रतज्ज्ञ दृष्टीची तपासणी करतात. प्रकाश संवेदना, रंग संवेदना आणि आकार ओळखण्याची क्षमता तपासली जाते. चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू किंवा इतर विकारांमुळे दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार महत्त्वाचे आहेत.

 

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar