सतत कम्प्युटर किंवा लॅपटॉप समोर तासंतास काम करणे, मोबाईलचा सतत वापर यामुळे डोळ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांचाही स्क्रीन समोर घालवण्याचा वेळ वाढला आहे. आता तर अनेक मुलांच्या शाळा, कॉलेज ऑनलाईन सुरू आहेत. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. याचा सगळ्यात जास्त धोका त्यांच्या डोळ्यांना आहे. अशांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
- काम संपल्यावर डोळे थंड पाण्याने धुवावे, त्याने डोळ्यातील उष्णता कमी होते आणि ताण कमी होतो.
- सतत काम करत असाल तर डोळ्याला आराम देण्यासाठी काही वेळ निदान 5 मिनिटं डोळे बंद करु शांत बसा. त्याने रेटीनावर आलेला ताण कमी होतो.
- काम करताना डोळ्याला पाणी येत असेल तर कोरफडचा तुकडा रात्री झोपताना डोळ्यावर ठेवावा.
- डोळ्याच्या कडा सतत ओल्या राहत असेल तर त्यावर लगेच उपाय करा कारण त्यामुळे डोळे खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे.
- सतत डोळे चोळू नका त्याने हाताला लागलेली घाण डोळ्यात जाण्याची शक्यता असते.
- जेवणानंतर सोफ खाताना त्यासोबतच भाजलेलं जवस खा.