Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कोव्हिड काळात डोळ्यांकडे दुर्लक्ष नको

by प्रभात वृत्तसेवा
November 3, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

– डॉ. आदित्य केळकर
वर्ष 2020 मधील बहुतांश काळ आपली स्वत:ची आणि आपल्या कुटुंबांची कोविड-19 कोरोनाविषाणूपासून संरक्षण करण्यीासाठी अनेक खबरदारीचे उपाय घेण्या मध्य उलटून गेला आहे. पण या काळादरम्यानन अनेक इतर आरोग्याविषयक आजारांकडे दुर्लक्ष केले. अर्थातच, हे घडले आहे आणि आजही शक्‍यतो घरीच राहणे व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. पण यासोबतच वैद्यकीय तपासणी कधी करावी याबाबत परीक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. या महामारीदरम्यीान डोळ्यांच्या आरोग्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष झाले आहे.

अनेक रूग्णांना वार्षिक डोळे तपासणीचे महत्त्व माहित आहे आणि ते नियमितपणे ही तपासणी करतातदेखील. पण कोविड 19 आपले वेळापत्रक बदलले आहे. अनेक लोकांमध्ये दृष्टीदोष किंवा अंधुकपणा किंवा डोळे लाल होणे यांसारखी लक्षणे आहेत. पण त्यांनी नेत्ररोगतज्ज्ञाशी सल्लामसलत करण्यास उशीर केला आहे. मधुमेहासारखे कोमॉर्बिड आजार आणि घरातूनच काम व मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण आणि कुटुंबांच्या व्हिडीओ मिटींग्जमुळे ग्लोईंग स्क्रिनचा (चमकणारा पडदा) अधिक वापर अशा कारणांमुळे मधुमेह संबंधित रेटिनोपॅथी, ड्राय आय डिसीज आणि दृष्ट्‌ वक्र होणे (रिफ्रॅक्‍टिव्हम एरर्स) असे आजार होण्याघचा धोका वाढला आहे. मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींची स्थिती देखील समुपदेशनाच्या अभावामुळे खालावत आहे.

साहजिकच लोक डॉक्‍टरांना भेटावे की भेट देण्यापूर्वी ही महामारी ‘संपण्याची’ वाट पाहावी या दुविधेमध्ये सापडले आहेत. दुर्दैवाने, आपल्याला एक गोष्ट निश्‍चित माहीत आहे की, कोविड-19 आजार सहजासहजी संपुष्टात येणार नाही. म्हणूनच आपण आपल्याच आरोग्यासोबत डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि परिस्थितीनुसार कोणती कृती करावी याबाबत जाणून घेतले पाहिजे. काही आजारांचे योग्यरवेळी उपचार केले नाही तर दृष्टी जाण्याचा देखील धोका निर्माण होऊ शकतो.

आरोग्य सेवा संस्था व डोळ्यांचे हॉस्पिटल्स सुरक्षित आरोग्यसेवा देण्यासाठी आणि रूग्णांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी विविध पातळ्यांवर आवश्‍यक खबरदारीचे उपाय घेत आहेत. क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाने स्वच्छता व सुरक्षिततेच्या खात्रीसाठी “वॉश’ (वर्कप्लेस असेसमेण्ट्‌ ऑफ सॅनिटेशन ऍण्ड हायजिन) मार्गदर्शकतत्त्वे सांगितली आहेत. रूग्णामध्ये सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जात आहे. मास्क घातल्याशिवाय कोणताही रूग्ण किंवा नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला जात नाही. वेगळे तपासणी करण्याची गरज असलेल्या कोविड-19 रूग्णांणसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेविषयक या सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या असल्यामुळे मी लोकांना त्यांचे डोळे तपासणी न टाळण्याचे किंवा विलंब न करण्याचे आवाहन करतो. वेळेवर डोळ्यांची तपासणी करणे ही काळाची गरज आहे.

(लेखक डॉ. आदित्य केळकर हे पुण्यातील विख्यात नेत्रशल्यविशारद आहेत.)

Tags: COVID-19Dr. Aditya Kelkareye care
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar