पुणे – एचआयव्ही टेस्ट (HIV test) करण्याचा निर्णय हा वैयक्तिक असला तरी तो बराच अवघड असतो. टेस्ट करण्यापूर्वी पुढच्या संभाव्य परीणामांचा विचार आधीच करायला हवा. कारण टेस्ट पॉझिटीव्ह आली किंवा निगेटीव्ह आली तरी त्याचा तुमच्या जीवनावर परीणाम होणार आहे. एडसवर रामबाण औषध अजून निघाले नाही.
मरण लांबवता येते एवढेच. आरोग्याचे सगळे नियम पाळले तर इतर सामान्य माणसासारखे त्यालाही चांगले आयुष्य जगता येते. टेस्ट पॉझिटीव्ह असली तरी एडस होईलच याची खात्री नसते. तो होणार की नाही या विचारांचे दडपण सतत मनावर असते. अशा लोकांनी लैंगिक संबंध ठेवताना, शिरेतून इंजेक्शन घेताना किंवा रक्तदान करताना आपल्यामुळे इतरांना व्हायरसचा संसर्ग होऊ नये याची फार काळजी घेणे आवश्यक आहे.
तुम्हाला संसर्ग झालेला असो किंवा नसो, पण त्यामुळे तुमचे आयुष्यच बदलून गेलेले असते. टेस्ट निगेटीव्ह आली तरी एचआयव्ही (HIV test) संसर्ग झालाच नाही असे समजू नये. एवढा सगळा विचार करुन मगच टेस्ट करण्याचा निर्णय घ्यावा. स्त्रीयांनी गरोदर होण्यापूर्वीच आपल्याला एडस आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. म्हणजे बाळाला धोका राहणार नाही.
एचआयव्ही टेस्ट (HIV test) पॉझिटीव्ह आली तरी आणि तुमचे आरोग्य कितीही चांगले असले तरी होणाऱ्या बाळाला एडस होण्याचा धोका तीस ते पन्नास टक्के असतोच. बाधीत अवस्थेत गरोदरपणाचा स्त्रीलासुध्दा धोका असतो. एचआयव्ही बाधीत बाळाला कोणताही रोग पटकन होऊ शकतो आणि शेवट मृत्यूच असतो.